गुन्हे शाखा , युनिट -६ मोठी कामगिरी १४ तोळे सोन्याचे दागिने चोरणारे आरोपीला अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

गुन्हे शाखा , युनिट -६ मोठी कामगिरी चेन स्नॅचींग करणा – या चोरटयास. १४ तोळे सोन्याचे दागिने चोरणारे आरोपीला अटक.

दिनांक – २९ / ०७ / २०२१ गुन्हे शाखा , युनिट -६ चेन स्नॅचींग करणा – या चोरटयास जेरबंद करून ७,०६,००० / – रु किचा मुद्देमाल हस्तगत करून केले १० गुन्हे उघड

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.क्र .३३४ / २०२१ भादवि कलम ३९२.३४ या गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा , युनिट -६ करत असताना दिनांक २४/०७/२०२१ रोजी गुन्हे शाखा , युनिट -६ , पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार युनिट -६ चे हद्दीमध्ये गस्त करित असताना पो.ना ७८०५ कानिफनाथ कारखेले व पो . शि . ८२०३ सचिन पवार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , वटपोर्णिमे दिवशी देवाची उरळी परिसरामध्ये सोनसाखळी चोरी करणारा इसम हा कोंढवा परिसरामध्ये त्याच्या पत्नीस भेटण्यास येणार आहे . अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरबाबत श्री गणेश माने , पोलीस निरीक्षक , गुन्हे शाखा , युनिट ६ , पुणे शहर यांना माहिती दिली असता त्यांनी

सदर ठिकाणी जावून आरोपीचा शोध घेऊन कार्यवाही करणेबाबत आदेशीत केल्याने सपोनि नरेंद्र पाटील यांनी स्टाफसह गल्ली नंबर १ , जे . के . पार्क , कोंढवा , पुणे येथे जावून सापळा रचून शिताफीने आरोपी( नामे असद उर्फ असदुल्ला माशाअल्ला जाफरी उर्फ इराणी ) , वय ४७ वर्षे रा . पठारे वस्ती , लोणीकाळभोर , ता . हवेली , जि . पुणे यास ताब्यात घेतले . त्यास गुन्हे शाखा , युनिट -६ , कार्यालयात आणून विश्वासात घेऊन दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता प्राथमिक तपासात त्याने सदरचा गुन्हा त्याच्या एका साथीदारासह केल्याचे सांगितले .

नमूद आरोपी व त्याचा साथीदार यांचेकडून पुणे शहरामध्ये सोनसाखळी चोरीचे एकूण ९ गुन्हे व मोटारसायकल चोरीचा १ गुन्हा असे एकूण १० गुन्हे उघडकीस आले असून त्याने गुन्हयातील सोन्याचे दागिने विशाल जगदीश सोनी , रा . कोंढवा . पुणे या सोनारास विकल्याचे सांगितल्याने नमूद सोनारास गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे .

नमूद गुन्हयामध्ये एकूण ७,०६,००० / – रु चा मुद्देमाल त्यामध्ये १४ तोळे सोन्याचे दागिने व गुन्हा करण्याकरिता वापरलेली चोरीची स्प्लेंडर मोटार सायकल पंचनाम्यांतर्गत हस्तगत करण्यात आली आहे .

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त श्री अशोक मोराळे गुन्हे शाखा पुणे , मा.पोलीस उप आयुक्त , श्री.श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहर , मा.सहा पोलीस आयुक्त श्री.लक्ष्मण बोराटे , गुन्हे -२ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट -६ चे पोलीस निरीक्षक , श्री . गणेश माने , सहा . पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील , अंमलदार मच्छिंद्र वाळके , कानिफनाथ कारखिले , नितीन शिंदे , नितीन मुंढे , प्रतिक लाहिगुडे , ऋषीकेश ताकवणे , ऋषीकेश व्यवहारे , सचिन पवार , ऋषिकेश टिळेकर , शेखर काटे , नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *