हडपसर तपास पथकाची कामगिरी.घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील १० लाख रूपयांचे २० तोळे सोने जप्त .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक १८/०७/२०२२ हडपसर पोलीस स्टेशन,पुणे शहर

घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील १० लाख रूपयांचे २० तोळे सोने जप्त .

जावयानेच केलेली घरफोडी “हडपसर तपास पथकाची कामगिरी फिर्यादी विश्वजीत अशोक कांबळे रा . इंद्रायणी सोसायटी ,साडेसतरा नळी , हडपसर पुणे यांनी त्यांचे घरामध्ये दिनांक १०/०७/२०२२ रोजी ११.०० ते १४.३० दरम्यान घरफोडी झाल्याची तक्रार दाखल झाली .

तपासात घरामध्ये कोणत्याही प्रकारची तोडफोड अगर कोणत्याही इतर वस्तुस हात लागलेला नसल्याने , दाखल गुन्हा हा ओळखीच्या व्यक्तींनी केला असावा ही शक्यता गृहीत धरून बारकाईने विचारपूस सुरु केली . त्या दरम्यान पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ यांचे माहितीवरून जावई निखील संभाजी पवार वय २३ वर्ष रा . संभाजीनगर चाळ , जयसिंगपुर , कोल्हापुर यास अधिक चौकशी केली असता त्याने सास – यांच्या घरात चोरी केल्याचे कबुल केले .

त्याचे जबाबानुसार घरातील सासरकडची सर्व मंडळी दुपारी पिक्चरला गेल्याची संधी साधून आरोपी जावई याने डुप्लीकेट चावीने फ्लॅट उघडून आत प्रवेश केला अणि कपाटातील सोन्याची चैन , गंठण , अंगठी , कानातील टॉप्स असा मुद्देमाल चोरून नेला .

आरोपीकडून त्याने चोरून नेलेले ७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा किं . रू ३,५०,००० / – चा माल जप्त करून हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ८३९ /२०२२ भा.दं.वि.क ४५४,३८० हा गुन्हा उघडकीस आणला आहे . हडपसरच्याच दुस – या चोरीच्या गुन्ह्यात

हडपसरच्याच दुस – या चोरीच्या गुन्ह्यात फिर्यादी शिवाजीराव जनार्दनराव पाटील वय ७० वर्ष हे पुणे मनपा पॅनलवर अॅडव्होकेट आहेत . त्यांना कार्यक्रमानिमीत्त बिदर , कर्नाटक येथे जाण्याचे असल्याने , ते घरात नसताना घरातील दागिने चोरी जातील या भितीने त्यांनी त्यांचे घरातील १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने प्रवासात सोबत घेतले होते . बिदर , कर्नाटक येथे जाण्यासाठी त्यांचा नेहमीचा ड्रायव्हर नसल्याने त्यांनी पर्यायी ड्रायव्हर जमिल शेख यास बोलावले व कर्नाटक येथे गेले . बिदर कर्नाटक येथुन कार्यक्रम उरकून पुण्यात आल्यावर दिनांक १२/०५/२०२२ रोजी सकाळी दागिने ठेवलेली सुटकेस पाहीली असता , त्यामध्ये दागिने दिसले नाहीत . त्याबाबत फिर्यादी यांनी दिनांक ०२/०७/२०२२ रोजी हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं ७९८ / २०२२ भादंविक ३७९ तक्रार दिलेली होती .

फिर्यादी यांचेकडे काम केलेला संशयीत ड्रायव्हवर याचे कोणतेही फोटो अथवा इतर उपयुक्त माहीती फिर्यादी यांचेकडे नव्हती . हडपसर पोलीस ठाणे तपासपथकातील अंमलदार यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणातुन आरोपी हा दापोडी येथील रहीवासी असल्याचे दिसून आल्याने तपास पथक अधिकारी विजयकुमार शिंदे , अविनाश शिंदे आणि पोलीस अंमलदार शाही शेख , अविनाश गोसावी , सुरज कुंभार यांनी सलग दोन दिवस दापोडी भागात फिरून आरोपीबाबत कोणतीही उपयुक्त माहीती नसताना अगर फोटो नसताना ,

आरोपी जमील अयुब शेख वय ४५ वर्ष रा . केदारी हाईटस फ्लॅट नं १० ,५ वा मजला , शिवाजी पतुळाजवळ , दापोडी पुणे याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे केले तपासात त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली देवून चोरून नेलेले दागीन्यापैकी १३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने किं . रू ६,५०,००० / – चे जप्त करण्यात आलेले आहेत .

हडपसर तपास पथकाने मागिल ५ महिन्यात ६७ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणून सोने , मौल्यवान दागिने आणि वाहने मिळून ६७ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .

सदरची कामगिरी ही मा .श्री .नामदेव चव्हाण सो , अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा.नम्रता पाटील सो , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे मागदर्शनाखाली मा . श्री . बजरंग देसाई सो सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , श्री . अरविंद गोकुळे सो , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर , पोनि . ( गुन्हे ) श्री . विश्वास डगळे सो , पोनि ( गुन्हे ) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे , पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे , पोलीस अंमलदार सुशील लोणकर , अविनाश गोसावी , संदीप राठोड , अंकुश बनसुडे , सचिन जाधव , शाहीद शेख , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे , सचिन गोरखे , सुरज कुंभार , भगवान हंबर्डे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे .

अरविंद गोकुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *