वाँटेड गुन्हेगाराला समर्थ पोलीसांच्या तपास पथकाने केली अटक .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दिनांक १९ /०७/२०२२ खुनाचा प्रयत्न केलेल्या वाँटेड गुन्हेगाराला समर्थ पोलीसांच्या तपास पथकाने केली अटक .
समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १५/०२/२०२२ रोजी एडी कॅम्प चौक नाना पेठ पुणे या ठिकाणी जफर हकिम याच्यावर तीन जणांनी कु – हाडीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता . त्याबाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा र . नं ७६/२०२२ भा.द.वि. कलम ३०७,५०४,५०६ , भारतीय हत्यार कायदा कलम ४ ( २५ ) , महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल आहे .
(तपास पथका पोलीस अंमलदार हेमंत पेरणे ची कामगिरी.)
दाखल गुन्हयाच्या उर्वरित आरोपीचा शोध चालू असताना पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की , सदर गुन्हयातील ०२ महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार उमरअली गफार शेख वय २० वर्षे हा त्याचा जुन्या घराचा राहण्याचा पत्ता बदलून तो साईबाबानगर कोंढवा पुणे या ठिकाणी एका भाडयाच्या घरात त्याच्या कुटंबासमवेत राहत आहे . पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांनी तात्काळ सदरची बातमी त्यांनी तपास पथकातील अधिकारी यांना दिली . सदर बातमीच्या अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे व पोलीस निरिक्षक ( गुन्हे ) उल्हास कदम यांना माहिती देवून त्यांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे सदर ठिकाणी जावुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत त्यांनी मौखीक आदेश दिले .
लागलीच पोलीस उप -निरीक्षक सुनिल रणदिवे व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी कायदेशीर कारवाईकामी खाजगी वाहनाने बातमीचे ठिकाणी साईबाबानगर कोंढवा पुणे येथे जावून बातमीची खात्री केली . आरोपींच्या वडिलांनी दरवाजा उघडल्यानंतर पोलीस बघताच उमर अली शेखने त्याच्या घराच्या गॅलेरीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला . परंतू सदर पोलीस स्टाफ यांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले . सदर आरोपीला ताब्यात घेतले म्हणून स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती दिली . त्यास समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी आणून त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक केली.सदर आरोपीवर यापुर्वी गंभीर स्वरूपाचा १ गुन्हे दाखल आहेत .
सदरची कामगिरी ही मा . राजेंद्र डहाळे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , मा . श्रीमती प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ- १ पुणे शहर , मा . श्री . सतिश गोवेकर , सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे श्री . रमेश साठे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , उल्हास कदम , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविण जाधव , पोलीस उप निरीक्षक सुनिल रणदिवे , पोलीस अंमलदार हेमंत पेरणे , सुभाष पिंगळे , रहिम शेख , श्याम सुर्यवंशी , प्रमोद जगताप , जितेंद्र पवार , गणेश वायकर , दत्तात्रय भोसले , लखन शेटे मपोअं . प्रिया गंगावणे यांनी केली आहे .
रमेश साठे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad