दुचाकी चालवण्याची हौस भागवण्यासाठी वाहने चोरी करणारे आरोपीला पोलिसांनी केली अटक.
ACS POLICE CRIME SQUAD
युनिट १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार अमोल पवार इम्रान शेख ची कामगिरी.
दिनांक २०/११/२०२१ युनिट १ , गुन्हे शाखा , पुणे शहर दुचाकी वाहन चालवण्याच्या हौसेसाठी वाहन चोरी करणा – या विधीसंघर्षित बालकाकडुन रु १,१०,०० किंमतीच्या ३ दुचाकी हस्तगत . ”
दि . १९ / ११ / २०२१ युनिट १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे युनिट १ च्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार इम्रान शेख यांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की खडक पोलीस स्टेशनचे हददीतील काशेवाडी भागात विधीसंघर्षित बालक चोरीच्या दुचाकी फिरवत आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवून परवानगीने युनिट १ , गुन्हे शाखा पुणे शहर पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड स्टाफसह बातमीप्रमाणे जावुन नमुद विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यात एक अॅक्टीवा गाडी मिळुन आली त्या गाडी बाबत त्याच्याकडे चौकशी करता सदरची गाडी त्याने सेवन लव चौकातुन चोरल्याचे कबुल केले सदर गाडी बाबत खडक पोलीस स्टेशन येथे खात्री केली असता खडक पोलीस स्टेशन.प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाल्याने सदर विधीसंघर्षित बालकाकडे अधिक चौकशी करता त्याने आणखी दोन वाहने चोरल्याचे सांगितले सदर विधीसंघर्षित बालकाकडुन एकुण १,१०,००० / – रु किंमतीची ३ वाहने हस्तगत करण्यात आली असुन खडक पोलीस ठाण्याकडील .असे दोन वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यात आले असुन इतर वाहनांची माहिती काढण्याचे काम चालु आहे .
सदर विधीसंघर्षित बालकास पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे . सदर विधीसंघर्षित बालकाकडे चौकशी केली त्या दरम्याने त्याने दुचाकी फिरवण्याची हौस होती परंतु घरी दुचाकी नाही आणि विकत घेऊ शकत नाही म्हणुन दुचाकी चालवण्याची हौस भागवण्यासाठी वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे .
सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त पुणे शहर , श्री अमिताभ गुप्ता , मा . पोलीस सह आयुक्त , डॉ . रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री रामनाथ पोकळे , मा.पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , मा . सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे- १/२ श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदशनाखाली युनिट १ , गुन्हे शाखा , पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे , पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड , सुनिल कुलकर्णी पोलीस अंमलदार अमोल पवार , अजय थोरात , इम्रान शेख , तुषार माळवदकर सतिश भालेकर , महेश बामगुडे यांनी केली आहे .