जुबेर बाबु शेख यांना खंडणी मागणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक,

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जुबेर बाबु शेख यांना खंडणी मागणाऱ्यांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

या प्रकरणी जुबेर बाबु शेख यांनी फिर्यादीवरून दीपक विजय निंबाळकर वय २९, रा. निंबाळकरवस्ती,पिसोळी, ता. हवेली गणेश जगताप वय २८, रा. महम्मदवाडी, हडपसर आणि अमर अबनावे वय२९ रा. उरळी देवाची‌ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

जुबेर शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर चिटणीस आहेत. त्यांचा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांचे पिसोळी येथे दोन ठिकाणी मिळकती आहेत. त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर राडारोडा टाकला होता.

तो राडारोडा उचलण्यासाठी फिर्यादी व त्यांचा मित्र सचिन ननावरे यांना फोन करुन उचलण्यास सांगितले. त्यासाठी दीपक निंबाळकर व त्याच्या साथिदारांनी ५ लाखांची मागणी केली होती. शेख यांना पैसे घेऊन कात्रज रोडवरील कान्हा हॉटेल येथे बोलावले. शेख यांनी याची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे केली.

तक्रारदार एक पुरुष जुबेर शेख यांची मौजे पिसोळी पुणे येथील मिळकत ही जमीन असुन तेथे जाण्या येण्याकरीता असलेल्या रोडवर गैरअर्जदार नामे दिपक निंबाळकर रा . निंबाळकर वस्ती , पिसोली ता . हवेली पुणे याने राडारोडा टाकुन अर्जदार यांना फोन करुन सदरचा राडारोडा हटविण्यासाठी ५ लाख रुपये मागणी करत असल्याने अर्जदार यांनी मा . पोलीस उप आयुक्त गुन्हे यांचेकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता . दि . २२/११/२०२१ रोजी अर्जदार यांना गैरअर्जदार दिपक निंबाळकर याने फोन करुन कान्हा हॉटेल , कात्रज कोंढवा रोड पुणे येथे खंडणीची रक्कम घेवुन बोलाविले बाबत खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांना सांगितल्याने त्याप्रमाणे खंडणी विरोधी पथक -२ , गुन्हे शाखा पुणे शहर यांनी कान्हा हॉटेल , कात्रज कोंढवा रोड पुणे येथे सापळा रचुन गैर – अर्जदार दिपक निंबाळकर व त्याचे २ साथीदार यांना अर्जदार यांच्याकडुन तडजोडी अंती ४ लाख रुपये स्विकारताना रंगे हात पकडले . अर्जदार यांनी त्यांचे विरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी नामे

१ ) दिपक विजय निंबाळकर रा . निंबाळकरवस्ती , पिसोळी , ता . हवेली , जि . पुणे ,

२ ) गणेश शामराव जगताप रा . महम्मदवाडी , हडपसर पुणे व

३ ) अमर बाळासाहेब अबनावे रा . उरळी देवाची , ता . हवेली , जि . पुणे

त्याचेविरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन पुणे यांचे विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. १०३७/२०२१ भा.दं.वि कलम ३८४ , ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वरील आरोपीस अटक करण्यात आलेली आहे .

सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त डॉ . रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , श्री रामनाथ पोकळे , मा.पोलीस उप – आयुक्त , ( गुन्हे ) श्रीनिवास घाडगे , सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे – २ श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – २ कडील पोलीस निरीक्षक , बालाजी पांढरे , पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण व पोलीस अंमलदार विजय गुरव , शैलेश सुर्वे , प्रदिप शितोळे , विनोद साळुंके , राहुल उत्तरकर , संग्राम शिनगारे , सचिन अहिवळे , सौदाबा भोजराव , अमोल पिलाने , प्रविण पडवळ , प्रदिप गाडे , मोहन येलपल्ले , चेतन शिरोळकर , रुपाली कर्णवर , • आशा कोळेकर सर्व नेमणूक खंडणी विरोधी पथक -२ , गुन्हे शाखा यांनी केलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *