हुक्का गोडावूनवर छापा मारून कोंढवा पोलिसांनी तब्बल २२,१७,५९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

ACS POLICE CRIME SQUAD

कामगिरीबाबत कोंढवा पोलिस ठाण्याच्या सर्व पथकाचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अभिनंदन केले आहे .

पुणे शहरात हुक्का गोडावूनवर छापा ; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.

पुणेः हुक्का गोडावूनवर छापा मारून कोंढवा पोलिसांनी तब्बल २२,१७,५९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे . या कामगिरीबाबत कोंढवा पोलिस ठाण्याच्या सर्व पथकाचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चांगली कामाला अभिनंदन केले आहे .

१५/११/२०२१ रोजी कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकातील पोउपनि स्वप्नील पाटील , पोहवा / ५४३ गरूड , पोना / ७७८२ जोतीबा पवार , पोना / ६९३१ तुषार आल्हाट , पोना / ८४८६ गोरखनाथ चिनके , पोना / ७९ निलेश देसाई , पोना / ११६१ सतिश चव्हाण , पोशि / ८५११ लक्ष्मण होळकर व पोशि / १००७३ किशोर वळे असे वरिष्ठ पोलिस निरीक्षाक कोंढवा पोस्टे यांचे आदेशांन्वये पोलिस स्टेशन हददीत बेकादेशीर रित्या चालू असलेल्या अवैध धंदयांवर कारवाई करणेकामी पेट्रोलिंग करीत होते

पोना / ६९३१ तुषार आल्हाट यांना साई सर्व्हिस समोर असलेल्या श्रीया हाईट्स या इमारतीच्या पार्किंगच्या जागेमध्ये असलेल्या गोडावूनमध्ये एकाने हुक्क्याचे फ्लेव्हर व हुक्का पिण्याकरीता लागणारे साहित्य विक्री करीता साठवून ठेवले आहे ,

अशी खात्रीलायक खबर मिळाल्याने सरदार पाटील , वरिष्ठ पोलिस निरीक्षक , जगन्नाथ जानकर पोलिस निरीक्षक गुन्हे व गोकुळ राऊत पोलिस निरीक्षक गुन्हे कोंढवा पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि स्वप्नील पाटील , पोहवा / ५४३ गरूड , पोना / ७७८२ जोतीबा पवार , पोना / ६९३१ तुषार आल्हाट , पोना / ८४८६ गोरखनाथ चिनके , पोना / ७९ निलेश देसाई , पोना / ११६१ सतिश चव्हाण , पोशि / ८५११ लक्ष्मण होळकर व पोशि / १००७३ किशोर वळे यांनी सदर ठिकाणी कारवाई केली .

१ ) शहेजाद आश्रफ रंगुनवाला ( वय ३७ वर्ष , रा द लेख डीस्ट्रीक ए २ १००४ येवलेवाडी पुणे ) , २ ) नवेद मुन्ने खान ( वय २१ वर्ष , धंदा मजुरी रा . बोबदेव घाट लेख डीस्ट्रीक येवलेवाडी पुणे ) व ३ ) शफीक महमंद मालापुरी ( वय १८ वर्ष धंदा- मजुरी रा . रा.बोबदेव घाट लेख डीस्ट्रीक येवलेवाडी पुणे ) यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एकूण २२,१७,५९० रुपये किंमतीचा हुक्का तसेच हुक्क्यचे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे . त्याबाबत कोंढवा पोलिस स्टेशन गु.र.नं. ९९२ /२०२१ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने ( महाराष्ट्र ) सुधारणा ) अधिनियम २०१८ चे कलम ४ – अ , २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

दाखल गुन्हयाचा पुढील तपास स्वप्नील पाटील , पोलिस उपनिरीक्षक , कोंढवा पोलिस ठाणे पुणे हे करीत आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *