येरवडा पोलीसांची कामगिरी : सराईत चोरट्यास मुद्देमालासह अटक :४ गुन्ह्यांची उकल.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

येरवडा पोलीसांची कामगिरी : सराईत चोरट्यास मुद्देमालासह अटक : ४ गुन्ह्यांची उकल.

पुणे, दि.१७ (ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६ )


येरवडा पोलीसांनी एका सराईत चोरट्यास मोठ्या शिफातीने अटक करून एकूण ४ गुन्ह्यांची उकल केली आहे. यावेळी एकूण अंदाजे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

येरवडा पोलीस स्टेशन हदीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना ,येरवडा तपास पथकातील पो.अंमलदार अमजद शेख व अनिल शिंदे यांना की, सराईत आरोपी यश कोंडार हा मेंटल हॉस्पीटलचे ग्राऊंडमध्ये कॉमरझोन जवळ थांबलेला आहे. सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम

यांना माहिती कळविली असता त्यांनी लागलीच कारवाईचे आदेश दिले. यावेळी तपास पथकाचे पोउपनि अंकुश डोंबाळे व कर्मचारी यांनी सदर ठिकाणी सापडा रचून

आरोपी यशदीप गोविंद कोेंडार, वय-२४ रा.लेन नं.२, संजयपार्क, कळस, विश्रांतवाडी यास ताब्यात घेतले.

आरोपीकडील दुचाकीबाबत चौकशी केली असता सदर दुचाकी चोरीची असल्याची माहिती उघडकीस आली. आरोपीस ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता एकूण ४ गुन्ह्यांची उकल झाली. यामध्ये ऍक्टीव्हा, बजाज पल्सर, लॅपटॉप असा एकूण १,७०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अंकुश डोंबाळे, सपोफौ प्रदिप सुर्वे, कर्मचारी गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, अमजद शेख, तुषार लोखंडे, कैलास डुकरे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे यांनी केली.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *