Breaking NewsCrime NewsPolice News

महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की,कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे : पुण्यात एका महिला पोलीस हवालदाराला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.दरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोंढवा पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. ‘तू पोलीस ठाण्याच्या बाहेर ये तुझ्याकडे बघते’ तुमची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे’ म्हणत एका उच्चशिक्षित महिलेने धक्काबुक्की केली आहे. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलीस हवालदार शीतल लक्ष्मण जमदाडे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साबिया इरम अक्रम खान या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्ररकरणी पोलीस हवालदार शीतल लक्ष्मण जमदाडे (वय ४०) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. साबिया इरम अक्रम खान असे धक्काबुक्की करणाऱ्या महिलेचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, साबिया खान हिच्याविरुद्ध नौशीन फैय्याज शेख यांनी तक्रार दिली होती. किरकोळा वादातून तक्रार दिल्याने पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती.
सोमवारी (२२ जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास साबिया कोंढवा पोलीस ठाण्यात आली. तिने पोलीस ठाण्याचे कामकाज सांभाळणारे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.तुम्ही दहावी उत्तीर्ण पोलीस आहात. आमच्यामुळे तुमचा पगार होतो. मी उच्चशिक्षित असून, तुमची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे’,

अशी धमकी तिने दिली. तसेच पोलीस ठाण्यात अरेरावी करून तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.साबिया खानने पोलीस ठाण्यात ठेवलेल्या गुन्हे नोंदविण्याच्या वहीचे पान फाडून टाकले. त्यावेळी जमदाडे यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने जमदाडे यांच्या कानाखाली मारली.‘तू पोलीस ठाण्यात बाहेर. ये तुझ्याकडे बघते’, अशी धमकी दिली. साबिया खान विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव तपास करीत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *