पिंपरी चिंचवडची कामगिरी २०० वाहनचोरी करणा – या आरोपीस दरोडा विरोधी पथकाकडून अटक करून , किं.रू. ३६,००,००० / – रू च्या ५१ दुचाकी हस्तगत.

ACS POLICE CRIME SQUAD

Pune Pimpri Chinchwad’

दिनांक 26/10/2021 रोजी दरोडा विरोधी पथकाचे पो उ मंगेश भांगे व पो अंमलदार खांडे, लोखंडे, कोकणे,शेडगे,बनकर,कोशल असे दिनांक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील टॉप २५ पाहिजे/फरारी आरोपी बाबत माहिती काढून शोध घेणे बाबत दिलेल्या आदेशान्वये, माहिती घेत असताना, २ संशयित इसम हेच वारंवार वाहनचोरी करीत असल्याचे निदर्शनास आले. त्याकरिता सतत दोन महिने ५०० हुन अधिक सी सी टी वि फुटेज तपासून सदर आरोपी बाबत माहिती घेत असताना पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे यांना त्यांचे खास बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, पवना हॉस्पिटल तळेगाव येथे दोन संशयित इसम येणार आहेत परंतु त्यांना पोलिसांची चाहूल लागल्याने ते पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून आरोपी नामे

१) शंकर भीमराव जगले, वय २२ वर्ष, रा पिंपरी, 

२) संतोष शिवराम घारे, वय ३८ वर्ष, रा ओझर्डे, ता मुळशी जि पुणे,

यांना अटक करून त्यांचे कडून एकूण ३६,००,००० रुपये किंमतीच्या चोरीच्या ५१ दुचाकी गाड्या जप्त करून त्यांचे कडून खलील प्रमाणे ३५ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत .


उर्वरित १४ दुचाकी वाहनाचे मालकांचा शोध घेणे चालू आहे .


सदर कामगिरी मा पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश,अपर पो आयुक्त श्री संजय शिंदे,पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री.काकासाहेब डोळे, सहा पोलीस गुन्हे १/२ श्री.प्रशांत अमृतकर,व पो नि उत्तम तांगडे, सपोनि कैलासे यांचे मार्गदर्शनाखाली पो उ नि मंगेश भांगे,पो हवा महेश खांडे, विक्रांत गायकवाड, उमेश पुलगंम, राहुल खार्गे,राजेंद्र शिंदे ,पो ना नितीन लोखंडे, सागर शेडगे, गणेश कोकणे, राजेश कोशल ,आशिष बनकर,गणेश सावंत,विनोद वीर,समीर रासकर,अमर कदम,प्रवीण कांबळे,रोंगे,सुपे यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *