सहकारनगर पोलीस स्टेशन , पुणे शहर रिक्षामध्ये पॅसेंजर म्हणुन बसवुन दगडाने मारहाण करुन जबरी चोरी करणा – या दोन सराईत गुन्हेगारांना पोलीसांकडुन २४ तासात अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सहकारनगर पोलीस स्टेशन , पुणे शहर रिक्षामध्ये पॅसेंजर म्हणुन बसवुन दगडाने मारहाण करुन जबरी चोरी करणा –

या दोन सराईत गुन्हेगारांना पोलीसांकडुन २४ तासात अटक

ONLINE PORTAL NEWS WAJID S KHAN

सहकारनगर पोलीस स्टेशनचे हद्दित तळजाई पठार भागात एका इसमास दगडाने मारहाण करुन त्यांचे कडील ६०,१०० / – रुपये किमतीचे लॅपटॉपची जबरी चोरी करुन एक रिक्षा चालक व त्याचा साथीदार असे दोन अनोळखी इसम पसार झाले होते.

सदरबाबत स.नगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं .१६६ / २०२१ भा.द.वी.कलम ३९७ , ३२३ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे . दाखल गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती देसाई व पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) युनुस मुलानी स.नगर पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली तपास पथकाचे पोलीस अधिकारी सुधीर घाडगे व तपास पथकाचे तसेच सहकारनगर पोलीस चौकीचे मार्शलचे पोलीस अंमलदार करीत असताना सहकारनगर चौकी मार्शलचे अंमलदार पो.शि .८६०० किसन चव्हाण व पो.शि .८६१० धनंजय भिसे यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की , दाखल गुन्हा करणारे गुन्हेगार त्यांचे ताब्यातील रिक्षासह धनकवडी स्मशान भुमीचे पाठीमागील रोडवर असलेल्या तळजाई पठाराचे शेवटचे बस स्टॉपजवळ इतर वाहनांचे आड रिक्षा पार्क करुन लपुन बसले आहेत . लागलीच मा.वरिष्ठांचे आदेशाने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे सदर ठिकाणी रवाना झाले व तेथे रिक्षात लपुन बसलेल्या दोन्ही गुन्हेगारांना मुद्देमालासह ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १ ) गणेश हरीभाऊ धरपाळे वय ३३ वर्षे रा.स.नं .१६ हरीकृपा निवास राजगड व्हिलाशेजारी आंबेगाव पठार पुणे मुळ रा.मु.वांजळे पो.दापोडे ता.वेल्हे जि.पुणे व २ ) गोकुळ उर्फ बापु सखाराम खुळे वय ३२ वर्षे रा.संतोषनगर कात्रज पुणे मुळ रा.मु.पो.दामगुडे आसणी ता.वेल्हे जि.पुणे सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणुन नमुद गुन्हयात अटक केली आहे . दाखल गुन्हयात अटक केलेल्या वर नमुद चोरटयांवर यापुर्वी पुणे शहर व पुणे जिल्हयामध्ये अशाच स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत . यातील आरोपी गणेश धरपाळे यास त्याचे साथीदारांसह सन २०१७ मध्ये खडक पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या रॉबरीच्या गुन्हयात अटक केली आहे . तसेच आरोपी नामे गोकुळ खुळे यास राजगड पोलीस स्टेशन नसरापुर ता.भोर येथे दाखल असलेल्या एक कोटी रुपयाचे रॉबरीचे गुन्हयात सन २०१८ मध्ये अटक झाली आहे . सदरचा गुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती देसाई व पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) युनुस मुलानी स.नगर पोलीस स्टेशन यांचे सुचनांनुसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे व अंमलदार यांनी कौशल्याने तपास करुन सदरचा गुन्हा २४ तासाचे आत उघडकीस आणला आहे . सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशीक विभाग , डॉ.श्री.संजय शिंदे सो , पोलीस उपायुक्त , परिमंडळ -२ , श्री.सागर पाटील , सहा.पोलीस आयुक्त , स्वारगेट विभाग सुषमा चव्हाण मॅडम , वपोनिरी श्रीमती स्वाती देसाई पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) युनुस मुलानी यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अधिकारी सुधीर घाडगे पोलीस हवालदार बापु खुटवड , पोलीस नाईक भुजंग इंगळे , पोलीस शिपाई महेश मंडलिक , सागर शिंदे , किसन चव्हाण , प्रदिप बेडीस्कर , धनंजय भिसे यांनी केली आहे .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *