रवींद्र बर्‍हाटेचा साथीदार अन् मोक्का मधील फरार आरोपी प्रशांत जोशी अटकेत; गुन्हे शाखेनं कोथरूड परिसरातून उचललं

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेचा साथीदार अन् मोक्का मधील फरार आरोपी प्रशांत जोशी अटकेत; गुन्हे शाखेनं कोथरूड परिसरातून उचललं

ONLINE PORTAL NEWS 9822331526

युनिट -१ गुन्हे शाखा , पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . भरत जाधव , युनिट -१ गुन्हे कडील पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड , सुनिल कुलकर्णी , पोलीस अंमलदार विजेसिंग वसावे , अशोक माने , सचिन जाधव दत्ता सोनवणे , अय्याज दडडीकर , इम्रान शेख , यांनी केली आहे

ACS POLICE CRIME SQUAD NEWS

दिनांक – २७/०६/२०२१ युनिट – १ गुन्हे पुणे ची कामगिरी – मोका मधील फरार आरोपी प्रशांत पुरुषोत्तम जोशी जेरबंद

CHIEF EDITOR WAJID S KHAN

मा . पोलीस आयुक्त पुणे शहर व पोलीस सह आयुक्त पुणे यांनी पुणे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व जनतेच्या मालमत्तेचे रक्षण व्हावे तसेच कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडु नये म्हणुन पुणे शहरातील पोलीस अभिलेखावरील फरार व पाहीजे आरोपी , टोळीतील गुंड , दरोडा , जबरी चोरी , घरफोडी चो – या करणारे सराईत गुन्हेगार , यांचा शोध घेवुन त्यांचे हालचालीवर नजर ठेवुन त्यांचेविरुध्द कठोर कारवाई करणेबाबत सर्व पोलीस अधिकारी यांना वेळोवेळी आदेश दिलेले आहेत .

गुन्हयाची थोडक्यात हकीकत – फिर्यादी यांनी गुन्हयातील आरोपी रविंद्र ब – हाटे , देवेंद्र जैन , शैलेश जगताप , परवेझ जमादार , जयेश जगताप , प्रशांत जोशी , प्रकाश फाले , संजय भोकरे , विशाल तोत्रे , प्रेमचंद रतनचंद बाफना , प्रशांत बाफना , हरिष किरण बाफना , राज किरण बाफना , विनय मुंदडा यांनी सन २०१६ ते फेब्रुवारी २०२१ या दरम्यान आपसात संगणमत व कट कारस्थान रचुन फिर्यादी व त्यांचे सहकारी यांचेविरुध्द खोटे गुन्हे दाखल करुन फिर्यादी यांचे मालकीची , वहीवाटीची व ताब्यात असलेली सर्वे नं – ८७/१/१ पर्वती सहकारनगर पुणे येथील जमिनीचा व्यवहार करुन सहकारी यांचेकडुन ७० लाख घेवुन फसवणुक व विश्वासघात केला व फिर्यादी यांची जमिन बळकविण्याचे उददेशाने महसुल दप्तरी हरकती घेवुन जमिनीच्या व्यवहारात तडजोडसाठी ३ कोटी रुपयाची मागणी केली वेळोवेळी धमक्या देवुन फिर्यादी व त्यांचे सहकारी यांची प्रेस कॉन्फरन्स , प्रसार व इतर माध्यमातुन बदनामी करुन , फिर्यादी यांचे घरी हस्तक पाठवुन जमिन बळकविण्याचे उददेशाने जबरदस्ती करुन , धमकी देवुन कागदपत्रावर सहया करण्याची बळजबरी केली आहे . तपासात सदर गुन्हयामध्ये मोका कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे . चतुऋगी पोलीस स्टेशन पुणे शहर गुरनं – ७१/२०२० भा . दं . वि . कलम ४०६ , ४२० , ३८६ , ३८७ , ३८८ , ३८९ , ५०६ ( २ ) . १२० ( ब ) , १०९ , ३४ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन – १९९९ चे कलम ३ ( १ ) 11 , ३ ( २ ) . ३ ( ४ ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे . दिनांक – २६/०६/२०२१ रोजी युनिट – १ गुन्हे पुणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे हददीमध्ये गस्त घालत असताना पोलीस अमंलदार सचिन जाधव व दत्ता सोनवणे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की , गुन्हयातील पाहीजे आरोपी प्रशांत जोशी हा त्याचे नातेवाईकांना भेटण्यासाठी गांधी भवन स्मारक कोथरुड येथे येणार आहे . अशी खबर मिळाल्यावरुन पोलीसांनी त्या भागात सापळा लावला होता . संशयीत आरोपी प्रशांत जोशी वय – ४६ रा – प्लॅट नं १२ मे १ कृष्णलिला टेरेस , लेन नंबर ४ , महात्मा सोसायटी जवळ , गांधी भवन मागे , कोथरुड पुणे – ३८ हा त्याचे नातेवाईकास भेटण्यासाठी आला असता त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे व त्यास पुढील कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त चतुऋगी विभाग पुणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे . यापुर्वी गुन्हयामध्ये प्रकाश रघुनाथ फाले वय -४१ रा – सांगवी पुणे यास अटक करण्यात आलेली आहे . आरोपी विशाल गजानन तोत्रे हा मार्च महिण्यात मयत झाला आहे . इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत .

सदरची कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त श्री . अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ श्री . सुरेन्द्र देशमुख यांचे मार्गदशनाखाली युनिट -१ गुन्हे शाखा , पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . भरत जाधव , युनिट -१ गुन्हे कडील पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड , सुनिल कुलकर्णी , पोलीस अंमलदार विजेसिंग वसावे , अशोक माने , सचिन जाधव दत्ता सोनवणे , अय्याज दडडीकर , इम्रान शेख , यांनी केली आहे .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *