मित्रांनी केली मित्राचीच हत्या,खुन करुन बॉडी नाल्यात फेकुन दिल्याचे वाकड पोलीसांनी केले उघड, apcs.news
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पिंपरी चिंचवड हादरलं !मित्रांनी केली मित्राचीच हत्या,खुन करुन बॉडी नाल्यात फेकुन दिल्याचे वाकड पोलीसांनी केले उघड,वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.
पिंपरी : (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान
पिंपरी- चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मित्रांनीच आपल्या मित्राची हत्या केली आहे. मृत तरुणाने आई आणि बहिणी वरून अश्लील शिव्या दिल्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. मंगळवारी ही घटना घडली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

थेरगाव परीसरातील इसम नामे सुरज ऊर्फ जंजीर कांबळे वय ३० वर्ष रा.जगतापनगर लेन नं ५ थेरगांव पुणे हा मिसिंग असलेबाबत त्याची पत्नि आरती सुरज कांबळे यांचे तक्रारीवरुन वाकड पोलीस ठाणे येथे मनुष्य मिसिंग क्र. २८४ / २०२३ प्रमाणे दि. ०७/१०/२०२३ रोजी मिसिंग दाखल करण्यात आली..
काय घडले नेमके?
सुरज उर्फ जंजीर कांबळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर पंकज पाचपिंडे, अमरदीप उर्फ लखन जोगदंड असे आरोपींची नावे आहेत. मृत सुरज कांबळे हा ७ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. त्याच्या नातेवाईकांनी तो हरवला असल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, पोलिस आणि त्याचे कुटुंबीय त्याचे शोध घेत होते. अखेर १० दिवसांनी त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत नाल्यात सापडला. त्याचा पंचनामा केला असता त्याची हत्या झाल्याचे समोर आले.
यानंतर मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्याचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण यांना सोबतचे पोलीस अंमलदारांसोबत मिसींग व्यक्तीचा सर्वोतोपरी शोध घेणेबाबत आदेश दिले.वाकड पोलिसांनी पथक तयार करत आरोपींचा शोध सुरू केला.यादरम्यान तपास करताना सुरज कांबळे ज्या दिवशी बेपत्ता झाला त्या दिवशी सुरज सोबत पंकज पाचपिंडे आणि अमरदीप जोगदंड हे दारू प्यायला बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत होता. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावला. यानंतर त्यांची माहिती काढली असता ते दोघे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या शहरातून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी दोघांना तेथे जाऊन सापळा रचून अटक केली. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली यानंतर पोलिसांनी आपला हिसका दाखवल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा मान्य केला.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिचवड, मा. श्री.डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. विठ्ठल साळुखे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफी बाबाजान इनामदार, पोहवा. संदीप गवारी, पोहवा स्वप्निल खेतले पोहवा. दिपक सावळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा प्रमोद कदम, पोना. प्रशांत गिलबीले, पोना. अतिक शेख, पोना विक्रांत चव्हाण, पोना राम तळपे, पोशि अजय फल्ले, पोशि भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि कांतेय खराडे, पोशि विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331525

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad