बॉल पेनवरुन पोलीसांनी हस्तगत केला लाखो रुपयांचा मुद्देमाल ,

ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक २७/१२/२०२१ विमानतळ पोलीस ठाणे पुणे शहर ” संशयित वाहनामधुन आलेल्या इसमाकडे मिळालेल्या बॉल पेनवरुन पोलीसांनी हस्तगत केला लाखो रुपयांचा मुद्देमाल ,

विमानतळ तपास पथकाची धडाकेबाज कारवाई

विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील तपास पथकातील कर्मचारी पोना . अंकुश जोगदंडे , शिवराज चव्हाण व विनोद महाजन यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , एक वॅगेनार कार नंबर मधुन शिवाजी पुतळ्या जवळ निरगुडी रोड , लोहगाव पुणे येथे संशयित आरोपी नामे

गजराज मोतीलाल वर्मा , वय – ३८ वर्ष रा . पानमळा , धायरी – वडगाव , पुणे

व नागोबा मंदीर , माळे गल्ली , सांगली मुळगाव मु . पो . कोटरीता आष्टा , जि . सिव्होर राज्य मध्य प्रदेश येणार असल्याची बातमी मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी वरीष्ठांचे मार्गदर्शनाप्रमाणे सापळा लावुन , त्यास ताब्यात घेतले . त्याचे व त्याचेकडील वॅगेनार कारचे झडती मध्ये घरफोडी चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य मिळुन आले . त्यामध्ये एक सिल्व्हर रंगाचा SHEAFFER कंपनीचा बॉलपेन , त्यावर इंग्रजी मध्ये Aravind Hinge असे लिहलेला मिळुन आला . त्याचेकडे मिळुन आलेल्या बॉलपेन वरील नावाचे गृहस्थाची विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक १५/१०/२०२१ रोजीगु.र.नं . ३३० / २०२१ भांदविक ४५४ , ४५७ , ३८० , ४११,३४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे व फिर्यादी यांचे नाव अरविंद हिंगे असल्याचे पोलीसांचे लक्षात आले . ताब्यात घेतलेल्या इसमाकडे त्याबाबत विचारणा केली असता त्याने योजनानगर येथे घरफोडी चोरी केली . असल्याचे कबुल केले . तसेच त्याचे साथीदार नाम

गोरे ऊर्फ गणेश रती राणा , वय ३२ वर्ष , रा . रिध्दीसिध्दी सोसायटी , फ्लॅट नंबर १०५ , पेडगाव पनवेल , नवी मुंबई मुळ गाव मु.पो. कुंतीता बंडाली जि.मुगलशनदेश , नेपाळ व शशिकांत भिमराव जाधव वय -३२ वर्ष , रा.मु.बिटरगाव , पो . वांगी , ता . करमाळा जि . सोलापुर याचे मदतीने लोहगाव , चंदननगर परीसरा मध्ये खालील प्रमाणे घरफोडी गुन्हे केले असल्याचे सांगितले आहे . २ . १. विमानतळ ,चंदननगर गु.र.नं. ३३७/२०२१ भांदविक ४५४ , ४५७ , ३८० आरोपी यांचेकडुन वर नमुद घरफोडी चोरीच्या गुन्ह्या मधील चोरीस गेलेले एकुण २९ , २०,००० / – रुपये किंमतीचे सोन्याचे चांदीचे दागिणे , इतर साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे . यातील अटक आरोपी गजराज मोतीलाल वर्मा व गोरे रती राणा यांचेवर पुणे शहर पोलीस आयुक्ताल याचे कार्यक्षेत्रामध्ये यापुर्वी चोरी , घरफोडी चोरी अशा प्रकारचे २४ गुन्हे दाखल आहेत .

सदरची कारवाई ही श्री नामदेव चव्हाण , मा . अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर , श्री . रोहीदास पवार , मा.पोलीस उपायुक्त , परि -०४ पुणे शहर , श्री . किशोर जाधव , मा . सहा . पोलीस आयुक्त , येरवडा विभाग , पुणे शहर यांचे आदेशान्वये श्री भरत जाधव , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर व श्री मंगेश जगताप पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) , विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री . सचिन जाधव , पोलीस उप निरीक्षक , सहा . पोलीस फौजदार , अविनाश शेवाळे , गणेश साळुंखे , पो.हवा.रमेश लोहकरे , उमेश धेंडे , सचिन जाधव , रुपेश पिसाळ , हारुण पठाण , अंकुश जोगदंडे , विनोद महाजन , नाना कर्चे , शिवराज चव्हाण , गिरीश नानेकर , किरण अब्दागिरे यांचे पथकाने केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *