बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरू आहे रात्री २ वाजेपर्यंत पब.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

रात्री उशिरापर्यंत चालू असणाऱ्या डिस्को पबला पोलीस आयुक्त लगाम घालणार का?

कोरोनाचे सर्व नियम बसवले जातेय धाब्यावर? नियमावली फक्त सामान्यांनाच का?
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरू आहे रात्री २ वाजेपर्यंत पब.

प्रतिनिधी, पुणे शहरात अवैध धंदे चालू देणार नाही असे पुणे शहरात नियुक्ती झाल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मत व्यक्त केले होते. त्यानंतर ब-यापैकी अवैध धंदे बंद देखील झाले.

परंतु अवैध धंद्यांना लगाम घातला असला तरी बेकायदेशीरपणे चालणाऱ्या डिस्को पबला आवर घालणार कोण? पुणे शहरात अनेक ठिकाणी लाईट लाईफ सुरू असून रात्री दोन-तीन वाजेपर्यंत पब चालत असल्याने स्थानिक नागरिकांना ते डोकेदुखी चे ठरत असताना पोलीस निरीक्षकांचे दुर्लक्ष होत आहे.

मध्यंतरी पोलीस आयुक्तांनी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध आणि बेकायदेशीर धंदे सुरू असतील त्या हद्दीतील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना जबाबदार धरण्यात येईल व आप आपल्या हद्दीत अवैध धंदे चालू नसल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे देखील आदेश काढले होते.

परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी कितपत झाली या बद्दल वरिष्ठ सांगू शकतात? बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज बहादुर मिल रोड येथील हॉटेल ग्रॅण्ड जवळ 2BHK पब रात्री उशिरापर्यंत चालू असताना कोणाच्या आशिर्वादाने सदरील 2BHK पब चालू आहे? काल रात्री २५ डिसेंबर रोजी रात्री २ वाजून गेले तरी पब चालू असल्याचे नागरिकांनी पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींनीच्या निर्दशनास आणून दिले आहे.

२४ डिसेंबर पासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजल्या पर्यंत शासनाने निर्बंध घातले आहे. परंतु त्या निर्बंधाची ऐशी तैशी की तैशी केली जात असताना पोलीसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याचे कालच्या पार्टीतून दिसून आले आहे.

सर्व सामान्यांसाठी मास्कची कारवाई करणा-या पुणे पोलिसांना विना मास्क व सोशल सोशल डिस्टंटचा फज्जा उडविला जात असताना दिसत नाही का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. अधिक माहिती घेतली असता वसुलीवाल्यांची मेहरबानीने बेकायदेशीरपणे पब चालू असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. लवकरच उलगडा करणार आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *