कोंबिग ऑपरेशन करुन सराईत गुन्हेगारांवर केले प्रतिबंधक कारवाई

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – ० ९ / ०७ / २०२१ गुन्हे शाखेकडील अंतर्गत कारवाई पोलीस आयुक्तालय , पुणे शहर हद्दीत कोंबिग ऑपरेशन करुन सराईत गुन्हेगारांवर केले प्रतिबंधक कारवाई

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता यांनी अपर पोलीस आयुक्त गुन्हे , पोलीस उपआयुक्त गुन्हे यांना पुणे शहरात कोबिग ऑपरेशन करुन गुन्हेगारांना चेकौंग करुन प्रतिबंधक कारवाई करणेकामी दिलेल्या आदेशान्वये , पुणे पोलीस आयुक्तालय हददीत गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांची पथके स्थापन करून पुणे शहरातील वेगवेगळया परीसरात दिनांक ०८/०७/२०२१ रोजी २०/३० ते दि .०९ / ०७ / २०२१ रोजी ००/३० वाजेपर्यंत कोबिग ऑपरेशन करुन खालील प्रमाणे कारवाई केलेली आहे . आरोपी चेकींग अभियानमध्ये एकुण २४९ गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून त्यापैकी ६६ गुन्हेगार मिळुन आले आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे १ केस करून १ आरोपी अटक करून त्याचेकडून रू . २८,००० / – चे एक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे .

आर्म अॅक्ट कलम ४/२५ प्रमाणे एकुण ५० केसेस करुन त्यामध्ये एकुण ५० आरोपींना अटक करुन त्यांचे ताब्यातुन ३६ कोयते , ०२ पालघन , ०७ तलवार , ०२ सत्तुर , ०२ चाकु असा एकुण १२,२२५ / -रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे १. सुधीर उर्फ गटया चंद्रकांत गवस रा . येरवडा पुणे , २ . लक्ष्मीकांत उर्फ लक्या सुर्यकांत जावळे रा . मंगळवार पेठ , पुणे ३. अजरुद्दीन उर्फ अज्जु मेहबुब शेख रा . हडपसर , पुणे . ४. खुशाल उर्फ दाद्या संतोष शिंदे रा . अप्पर बिबवेवाडी , पुणे ५.मनोज अरूण पांडागळे रा . कोंढवा पुणे ६. प्रेम अंकुश शिंदे रा . आंबेगाव , पुणे ७. सर्फराज उर्फ डर समिर शेख रा गंजपेठ पुणे ८ , योगेश बाबुराव पाटणे रा . कसबा पेठ , पुणे ९ . शुभम राजेश भोसले रा कसबा पेठ पुणे या तडीपार इसमानी तडीपार आदेशाचा भंग करुन पुणे शहरात वास्तव्य करीत असल्याचे मिळुन आलेने त्यांना अटक करण्यात आले आहे . या मध्ये गुन्हे शाखेने एकुण ०५ व पोलीस स्टेशनने ०४ अशा एकुण ० ९ केसेस केलेल्या आहेत .

एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे ०१ केस करुन ०२ आरोपी अटक करुन १ किलो ५०० ग्रॅम गांजा , असा एकुण किं.रु .४०,००० / – चा मुद्देमाल हस्तगत केला आहे .

भारती विद्यापीठ ५१४/२०२१. एनडीपीएसअॅक्ट. ८| ( क ) , २० ( ब ) ( II ) ब , २९

१) सागर शरद धुमाळ वय २४ ,रा. जनता वसाहत , पुणे

२). शिवाजी खंडागळे वय २० रा.न – हेगाव , मुळगांव-सोलापूर

माल जप्त कि .रु १५,०००/ – ची १ किलो ५०० ग्रॅम गांजा / – चा कि.रू. २५,००० / – ची एक ज्युपिटर गाडी .असा एकुण कि.रू. ४०,००० / चा माल जप्त केला आहे .

युनिट ६ , गुन्हे शाखा यांनी लोणीकंद पो स्टे गुन्हा रजि नं .९२ / २०१५ भा.द.वि.कलम , ३२४,३२३ . मधील पाहीजे आरोपी नामे सागर बाळु धोत्रे रा वाघोली पुणे यास ताब्यात घेवुन वपोनि लोणीकंद पो स्टे यांचे ताब्यात देण्यात आले आहे . युनिट २ , गुन्हे शाखा यांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन टोळ्यांमधील १० आरोपी अटक करून रू . ६०० / – चे २ कोयते जप्त करून भारती विद्यापीठ पोस्टे येथे गुरनं . ५१३/२०२१ व गुरनं . ५१५/२०२१ प्रमाणे ०२ गुन्हे दाखल केलेले आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

वरील प्रमाणे कारवाई ही मा . पोलीस आयुक्त पुणे शहर श्री . अमिताभ गुप्ता यांचे आदेशान्वये पोलीस सहआयुक्त श्री . रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री . अशोक मोराळे . पोलीस उपआयुक्त , गुन्हे श्रीनिवास घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली सहा . पोलीस आयुक्त गुन्हे शाखा तसेच युनिट , पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे पथकाने कामगिरी केली आहे . यापुढेही कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येवून गुन्हेगारांचे हालचालींवर सक्त नजर ठेवून त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे ,

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *