लोखंडी कोयता बाळगणा – या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास केले जेरबंद

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – ० ९ / ०७ / २०२१ दरोडा व वाहनचोरी पथक -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर लोखंडी कोयता बाळगणा – या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास केले जेरबंद

ONLINE PORTAL NEWS 9822331526

दिनांक ०८/०७/२०२१ रोजी सपोफौ शेख , पोना ७८३ पाटोळे व पोना ६९२९ ढगे असे मा.वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोंबिग ऑपरेशनचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान बंडगार्डन पोलीस स्टेशनचे हद्दीत ताडीवाला रोड येथे आलो असता पोना .७८३ , गणेश पाटोळे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराने समक्ष येवुन बातमी दिली की , पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे करण विशाल लाचारकर , रा . ताडीवाला रोड , पुणे हा पंचशील चौकाकडे जाणा – या रोडवर , अतिथी स्नॅक्स बंद दुकानाच्या समोर , ताडीवाला रोड , पुणे येथे कोयता बाळगुन फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदर बातमीची योग्य ती खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सदर बातमीची खातरजमा झाल्याने स्टाफचे मदतीने वरील ठिकाणी जावुन खात्री केली असता वरील नमुद वर्णनाचा इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव , पत्ता विचारता त्याने त्याचे नाव , पत्ता करण विशाल लाचारकर , वय -२० वर्षे , रा.इंदिरा मित्र मंडळाजवळ , १३ , ताडीवाला रोड , पुणे असे असल्याचे सांगितले . त्यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचेजवळ एक लोखंडी कोयता मिळुन आल्याने सदर लोखंडी कोयत्याबाबत त्याचेकडे विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ , गुन्हे शाखा , पुणे शहर येथील कार्यालयात आणुन त्याचेविरुध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं १५२/२०२१ , आर्म अॅक्ट ४ सह २५ व महा पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

ONLINE PORTAL NEWS 9822331526

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त , श्री.अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त , श्री.डॉ. रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त , ( गुन्हे ) , श्री.अशोक मोराळे , मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे , श्री.श्रीनिवास घाडगे , मा.सहा.पोलीस आयुक्त , श्री.सुरेंद्रनाथ देशमुख ( गुन्हे शाखा -१ ) यांचे मार्गदर्शनाखालील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -१ , गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक , शिल्पा चव्हाण , सपोनि.जुबेर मुजावर , स.पो.फौ.शाहिद शेख , पो.ना.गणेश पाटोळे , पोना.प्रमोद मोहिते , पोना.गणेश ढगे , दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *