सांबराची शिंगे विक्री करणेस घेवून जाणारे इसमास गुन्हे शाखा , युनिट ६ कडुन अटक.
ACS POLICE CRIME SQUAD WAJID SKHAN
पुणे शहर अवैधरित्या अमुल्य किंमतीची सांबराची शिंगे विक्री करणेस घेवून जाणारे इसमास गुन्हे शाखा , युनिट ६ कडुन अटक.
दिनांक २१/०५/२०२१ रोजी गुन्हे शाखा , युनिट ६ कडील पथक हे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पो.ना. ७३१७ मुंढे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , एक इसम तस्करी केलेल्या सांबराच्या शिंगांची विक्री करण्याकरीता अॅक्टिवा वरुन फुलगाव परिसरात येणार आहे . अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी श्री.गणेश माने , पोलीस निरीक्षक , गुन्हे शाखा युनिट -६ , पुणे शहर यांना कळविले असता त्यांचे मार्गदर्शक सुचना व आदेशाप्रमाणे फुलगाव फाटा चौक , ता . हवेली , जि . पुणे येथे सापळा रचुन इसम नामे प्रविण दिलीप शिंदे वय २७ वर्षे रा . मु.पो.पिंपरखेड ता . शिरुर जि.पुणे . यास ताब्यात घेवून त्याचे ताब्यातुन अमुल्य किमतीची सांबर जातीचे प्राण्याची ३ शिंगे , १ अॅक्टीवा मोपेड व १ पोते असा एकुण ३५,००० / – रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे . नमुद आरोपीविरुध्द वन्यजिव ( संरक्षण ) अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गुन्हयाचा तपास चालू आहे . नमुद गुन्हयाचा तपास श्री.गणेश माने , पोलीस निरीक्षक , युनिट ६ , पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली नरेंद्र पाटील , सहा.पोलीस निरीक्षक , युनिट ६ , हे करीत आहे . सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह – आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , श्री.अशोक मोराळे , मा.पोलीस उप आयुक्त , श्री.श्रीनिवास घाडगे , मा . सहा.पोलीस आयुक्त , गुन्हे २ , श्री.लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट ६ चे पोलीस निरीक्षक , श्री.गणेश माने , सहा.पोलीस निरीक्षक , नरेंद्र पाटील अंमलदार मच्छिंद्र वाळके , नितीन मुंढे , कानिफनाथ कारखेले , नितीन शिंदे , प्रतिक लाहिगुडे , शेखर काटे , नितीन धाडगे व करण ढंगारे यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD
WAJID S KHAN