आंदेकर टोळीतील दुहेरी मोक्का मध्ये फरारी असणा – या कुप्रसिध्द गुन्हेगारांना कोल्हापूर येथून ताब्यात घेवून अग्निशस्त्र हस्तगत करूनच चतुःशृंगी पोलीसांनी केले जेरबंद.
ACS POLICE CRIME SQUAD
आंदेकर टोळीतील दुहेरी मोक्का मध्ये फरारी असणा – या कुप्रसिध्द गुन्हेगारांना कोल्हापूर येथून ताब्यात घेवून अग्निशस्त्र हस्तगत करूनच चतुःशृंगी पोलीसांनी केले जेरबंद.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार वाघचवरे यांनी चतुःशृंगी पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड वरील पाहिजे व फरारी आरोपींची यादी तयार करून त्यामधील मोका व दरोडयातील सराईत आरोपी सुरज ऊर्फ गणेश अशोक वड्ड व पंकज वाघमारे यांचा शोध घेणे बाबत सुचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे चतुःशृंगी पोलीस स्टेशन तपास पथकातील अमलदार इरफान मोमीन व सुधीर माने यांना त्यांचे बातमीदारा कडून बातमी मिळाली की , पुणे शहरा मधील मोक्का मध्ये फरार असणारे आरोपी नामे सुरज ऊर्फ गणेश अशोक वड्ड व पंकज वाघमारे हे दोघे आदमापुर जि.कोल्हापूर येथे वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उप निरीक्षक श्री मोहनदास जाधव यांचे नेतृत्वाखाली टिम तयार करून त्यांना दिनांक १ ९ / ०५ / २०२१ रोजी वरील नमुद पत्यावर कोल्हापूर येथे पाठविले असता सदर पथकाने अदमापुर याठिकाणी जावून आरोपींचे ठावठिकाणा बाबत माहिती काढून आरोपी नामे १.सुरज ऊर्फ गणेश अशोक वड्डु वय २४ वर्षे रा .२२८ मंगळवार पेठ पुणे , २.पंकज गोरख वाघमारे वय २६ वर्षे रा.महात्मा जोतिबा फुले शाळेजवळ गाडीतळ हडपसर पुणे यांना दिनांक २०/०५/२०२१ रोजी कोल्हापूर येथून ताब्यात घेवून अ.क्र .१ यास चतुःश्रृंगी पो.स्टे.गुन्हा रजि .२३ / २०२१ भादविकलम ३ ९९ , ४०२ आर्म अॅक्ट ३ ( २५ ) , ४ ( २५ ) महा.पो.का.कलम ३७ ( १ ) सह १३५. १४२ गुन्हयात अटक केलेली आहे.तसेच आरोपी क्र .२ यास चतुःश्रृंगी पो.स्टेगुरनं ०६/२०२१ भादविक ३ ९ ५,३८४,४२७,५०६ ( २ ) , महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ ( १ ) ( ii ) .३ ( २ ) , ३ ( ४ ) या गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे.आरोपी क्र .१ सुरज ऊर्फ गणेश अशोक वड्ड याचेकडून दाखल गुन्हयामध्ये कि.रू .२०,४०० / -चे एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत.सदरचे आरोपी यांचे विरूध्द पुणे शहर परिसरात खुनाचा प्रयत्न , दरोडा , मारहाणीचे १५ गंभीर गुन्हे दाखल असून ते खालील गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी आहेत . १ ) चतुःशृंगी पो.स्टेगुरनं ०६/२०२१ भादविक ३ ९ ५.३८४,४२७.५०६ ( २ ) , महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ ( १ ) ( ii ) .३ ( २ ) , ३ ( ४ ) २ ) खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजि . ८२/२०२१ भादविक ३०७,१२० ( ब ) , १४३,१४७,१४८,१४ ९ , ५०६ ( २ ) .१० ९ , ५०७ महा पो.का.कलम ३७ ( १ ) सह १३५ , आर्म अॅक्ट क .४ ( २५ ) , क्रिमीनल लॉ अॅमेंटमेंट कलम ७.महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ ( १ ) ( ii ) .३ ( २ ) .३ ( ४ ) ३ ) चतुःश्रृंगी पो.स्टे.गुन्हा रजि .२३ / २०२१ भादविकलम ३ ९९ , ४०२ आर्म अॅक्ट ३ ( २५ ) , ४ ( २५ ) म पोकाक ३७ ( १ ) सह १३५ , १४२ सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता.मा.पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री नामदेव चव्हाण , मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ पुणे शहर श्री पंकज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली मा.सहा.पोलीस आयुक्त , खडकी विभाग पुणे शहर श्री रमेश गलांडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , चतुःशृंगी पो.स्टे.श्री राजकुमार वाघचवरे , पोलीस निरीक्षक गुन्हे श्री दादासाहेब गायकवाड , पोलीस उप निरीक्षक श्री मोहनदास जाधव , श्री महेश भोसले , अमंलदार सुधीर माने इरफान मोमीन , श्रीकांत वाघवले , तेजस चोपडे , संतोष जाधव , मुकुंद तारू , दिनेश गडाकुंश प्रकाश आव्हाड , प्रमोद शिंदे , ज्ञानेश्वर मुळे यांचे पथकाने करून प्रशसनीय कामगिरी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD 9822331526