पुणे – सासवड रोडवर गांजा विक्री करणा-यासाठी आलेल्या इसमास अटक
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CRIME REPORTER RAEES KHAN
दिनांक – १७/०७/२०२१ अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर

पुणे – सासवड रोडवर गांजा विक्री करणा – यासाठी आलेल्या इसमास अटक ४० किलो ५११ ग्रॅम गांजा कि रू .८,१०,२२० / – तसेच वॅगन आर कार कि रु ५,००,००० / – व रोख रुपये ४००० , एक मोबाईल फोन कि रु १५,००० / – चा असा एकुण १३,२९ , २२० / – ऐवज जप्त दि .१७ / ०७ / २०२१ रोजी ०९ / २० वा.चे सुमारास अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार मनोज साळुके यांना त्यांचे गोपनीय खब – याकडुन मिळालेल्या माहिती वरुन सातववाडी हडपसर बस स्टॉप समोरील सार्वजनिक रोडवर मारुती वॅगनआर कार क्र . एम . एच . १२ एस . क्यु . ८३५१ मधुन इसम नामे सचिन नरसिंग शिंदे वय ३३ वर्षे , रा , मु पो रामलिंग रोड , ओम रुद्रा सोसायटी , रुम नंबर ६ ता.शिरुर जि पुणे . हा सदर कारमध्ये ४० किलो ५११ ग्रॅम गांजा कि रू . ८,१०,२२० / – तसेच वॅगन आर कार एम एच १२ एस क्यु ८३५१ कि रु ५,००,००० / – व रोख रुपये ४००० , एक मोबाईल फोन कि रु १५,००० / – चा असा एकुण १३,२९ , २२० / – ऐवज अनाधिकाराने , बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आला . सदर बाबत त्याचेकडे विचारपुस केली असता सदरचा गांजा हा त्यास त्याची मालकिन घुगे रा.मु पो रामलिंग रोड , ओमरुद्रा सोसायटी , रुम नंबर ६ ता.शिरुर जि पुणे हिने विक्रीसाठी दिला असल्याचे सांगितले असलेने नमूद दोन्ही आरोपींचे गांजा विक्रीबाबत संगणमत असलेने फिर्यादी प्रविण कृष्णाजी शिर्के सहा पोलीस उपनिरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे यांनी त्यांचे विरुध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
वरील नमुद कारवाई ही मा.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , मा.सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त , अशोक मोराळे , मा.पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्रीनिवास घाडगे , मा.सहा पो आयुक्त , गुन्हे १ श्री सुरेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक , गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड , पोलीस अंमलदार प्रविण शिर्के , राहुल जोशी , विशाल शिंदे , विशाल दळवी , मारुती पारधी , प्रविण उत्तेकर , मनोज साळुके , नितीन जाधव , पांडुरंग पवार , संदेश काकडे , योगेश मोहिते , रुबी अब्राहम , रेहना शेख , यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
ONLINE PORTAL NEWS
CRIME REPORTER RAEES KHAN
9881888008