सामाजिक सुरक्षा विभागाकडून येरवडा-कल्याणीनगर परिसरातील एलिफंट अॅन्ड को. रेस्टॉरंट अॅन्ड बारवर कारवाई.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे :ऑनलाइन – (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.
दिनांक – १०/०६/२०२३ रात्री १०/०० वा. नंतर येरवडा परीसरात मोठया आवाजात साऊंड सिस्टीम लावुन संगीत वाजवणारे एलिफंट अॅन्ड को रेस्टॉरंन्ट अॅण्ड बार, गौरीशंकर कल्याणी बंगलो सो लेन नं. २ सेंट्रल अॅव्हेन्यु, निलांजली सोसायटी कल्याणीनगर, पुणे यांचेवर कारवाई करून त्यांचेकडील साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त.. पोलिसांनी ४ लाख रूपये किंमतीची साऊंड सिस्टीम देखील जप्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येरवडा परिसरातील काही रेस्टॉरंट अॅन्ड बारमध्ये रात्री १० नंतर मोठया आवाजात साऊंड सिस्टीम सुरू असते. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी कल्याणीनगर परिसरातील निलांजली सोसायटीतील गौरीशंकर कल्याणी बंगोल सो. ले नं. २, सेंट्रल अॅव्हेन्यु येथील एलिफंट अॅन्ड को. रेस्टॉरंट अॅन्ड बारवर छापा टाकला. तेथे मोठया आवाजात डीजे सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हॉटेलवर कारवाई करून तेथील ४ लाख रूपये किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आले असुन, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० चा नियम ५ चा भंग केलेबद्दल कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे कडुन जप्त केलेला मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सहा. पोलीस निरीक्षक, अश्विनी पाटील, आनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, अजय राणे, हनमंत कांबळे, अमेय रसाळ, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad