ओला रिक्षा,व बसची, वाट पाहत थांबणाऱ्या प्रवासी नागरिकांचे, हातातील मोबाईल, हिसकावून चोरी करणाऱ्या, सराईत चोरट्यास केली अटक.

ACS POLICE CRIME SQUAD

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.


प्रतिनिधी गोरख सोनवणे,

पुणे, स्टेशन परिसरातील ओला रिक्षा,व बसची, वाट पाहत थांबणाऱ्या प्रवासी नागरिकांचे, हातातील मोबाईल, हिसकावून चोरी करणाऱ्या, सराईत चोरट्यास केली अटक,)(१७ मोबाईल व ०४ दुचाकी जप्त,)

मोबाईल आणि वाहन चोरी करणारां आरोपी, हा ओला रिक्षा किंवा बसची वाट पाहत थांबणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल हिसकावून पळून जात होता, या सराईत गुन्हेगारच्या, पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी मुसक्या आवळल्या, असून त्याच्याकडून १७ मोबाईल व चार दुचाकी असा एकूण,३ लाख,६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे,
नोएल, ॲलन शबाना, रा, सर्किट हाऊस क्वीन्स गार्डन, रेल्वे पुलाखाली कोरेगाव पार्क, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे,
याप्रकरणी, यश सुंदरलाल जैन, रा, विश्रांतवाडी पुणे, यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,,,,, यश सुंदरलाल जैन हे, सकाळी आठच्या सुमारास ससून हॉस्पिटल, जवळ ओला रिक्षा ची, वाट पाहत उभे होते, त्यावेळी आरोपीने त्यांच्या हातातून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून, चोरून नेला, दरम्यान, याच परिसरातील, मोबाईल आणि दुचाकी, चोरी झाल्याच्या अनेक तक्रारी, प्राप्त झाल्या होत्या,
या गुन्ह्याचा तपास करताना, तपास पथकाने अनेक रस्त्यावरील, सी सी टी व्ही, पाहणी करून, संशयित आरोपीचे, फोटो, डेव्हलप करून ते बातमी दारापर्यंत, देऊन तपास चालू होता, संशयित आरोपी, हा, कोरेगाव पार्क येथे राहत, असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी सापळा रचून, त्याला ताब्यात घेतले, असता त्याने त्याचे नाव,नोएल, आलंन शबान, असे सांगितले, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने ससून हॉस्पिटल, आणि पुणे स्टेशन परिसरातून, मोबाईल चोरल्याची कबुली दिली, तसेच पुणे स्टेशन परिसरातून व येरवडा व, पौड, येथून, गाडी चोरल्याची कबुली दिली, त्याच्या कडून चोरीचे मोबाईल, आणि दुचाकी जप्त करण्यात आले आहे,
आरोपी वरती १४ गुन्हे दाखल झाले आहेत,

सदरची कामगिरी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,
सहआयुक्त, श्री रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, राजेंद्र डहाळे,
पोलीस उपायुक्त परिमंडळ २ सागर पाटील,
सहाय्यक पोलीस आयुक्त, यशवंत गवारी,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक, गुन्हे, अश्विनी सातपुते, यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक,, राहुल पवार, पोलीस उपनिरीक्षक विशाल माने, पोलीस उपनिरीक्षक, विनय जाधव, तसेच तपास पथकाचे पोलीस अंमलदार, फिरोज शेख, हरीश मोरे, प्रताप गायकवाड, नितीन जगताप, सुधीर,घोटकुळे, अनिल कुसाळकर, अमोल सरडे, संजय वनवे, सागर घोरपडे, किरण तळेकर,व, अंकुश खानसोळे, यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली,

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *