लोणी काळभोर वाहतुक पोलिस दलातील राजेश पवार चांगले कामगिरी केल्याबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त श्री.रितेश कुमार चे हातात सत्कार,,apcs.in
ACA POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे शहर वाहतुक पोलिस दलातील राजेश पवार, पुणे-सोलापुर रोडवर साडेतीन कोटी रुपयांची रक्कम जप्त करतेवेळी लाखो रुपयांचे आमिष धुडकावले..
पुणे:०९/०१/२०२४(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान,
लोणी काळभोर, (पुणे) वाहतूक पोलिसांना लाखो रुपयांचे आमिष दाखवून ही एकही रुपया न घेता तब्बल साडे तीन कोटी रुपये जप्त करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राजेश पवार हे लोणी काळभोर वाहतूक शाखेतील कर्मचारी कौतुकास पात्र ठरले आहेत. राजेश पवार कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार दरम्यान, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी राजेश पवार कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार करुन, त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.या संदर्भात सविस्तर हकीकत पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दि. ८ मे रोजी रात्री लोणी काळभोर वाहतूक शाखेचे राजेश पवार वाहनांची नाकाबंदी करून पुणे सोलापूर महामार्गावर मांजरी (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ संशयित वाहनाची तपासणी करत होते.यावेळी महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने निघालेली एक गाडी संशयितरित्या आढळून आली. यावेळी राजेश पवार यांनी वाहनचालकाला गाडी बाजूला घ्यायला लावून त्याच्या गाडीच्या डिकीची तपासणी केली.
त्यावेळी त्या डिकीत काही बॅगा संशयास्पदरित्या आढळून आल्या. तत्काळ राजेश पवार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रशांत कळसकर यांना फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच, तात्काळ घटनास्थळी येऊन डिक्कीत असलेल्या बॅगा उघडून पाहिल्या. यावेळी नोटांचे बंडल दिसून आले. त्यानंतर गाडीसह संशयित इसमाला हडपसर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. दोन पंचांसमक्ष पंचनामा करून वाहनात मिळून आलेल्या बॅगा तपासल्या. त्यामध्ये एकूण ३ कोटी ४२ लाख ६६ हजार २२० रुपये मिळून आले.ही रोख रक्कम हडपसर पोलिसांच्या मदतीने मोजून दोन पंचांसमक्ष जप्त करून सीलबंद करण्यात आली.
मात्र या पार्श्वभूमीवर या केलेली कामगिरी हि खरंच प्रशंसनीय आहे.

‘पुणे टाइम्स मिरर’ आणि ‘सीविक मिरर’ या अग्रगण्य दैनिकांच्या वतीने पोलीस दलात उल्लेखनीय कार्य केलेल्या आणि आपल्या कर्तबगारीने पोलीस दलाचा नावलौकिक उंचावलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘बिग सॅल्यूट’ पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल, लोहमार्ग अधीक्षक श्री तुषार दोषी यांच्यासह सर्व वरिष्ठ आयपीएस अधिकारी, आयएएस अधिकारी, आमदार, यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांची पुरस्कारार्थी म्हणून पोलीस आयुक्त सरांनी निवड केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in