बिबवेवाडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, पुणे शहरात घरफोड्या चोऱ्या व वाहन चोर्या, मोबाईल चोऱ्या करणारे ४ अट्टल गुन्हेगार जेरबंद,
बिबवेवाडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, पुणे शहरात घरफोड्या चोऱ्या व वाहन चोर्या, मोबाईल चोऱ्या करणारे ४ अट्टल गुन्हेगार जेरबंद,
पुणे : दिनांक .23/01/2021 रोजी बिबेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलींग फिरत असताना कुंभारवाडा भगली हॉस्पीटल चौकाचे दिशेने जात असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार तानाजी सागर यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, निलकमल सोसायटीकडे जाणाया रोडच्या बाहेर अंदाजे वयाने 20 ते 25 वर्षे वयोगटातील तिन इसम संशयीतरित्या थांबलेले आहेत अशी माहीती प्राप्त होताच तपास पथकातील स्टाफ त्यांचे दिशने जात असताना त्यांना पाहून सदरचे संशयीत इसम निलकमल सोसायटीमध्ये वेगवेगळया दिशने पळुन जात असताना त्यांना शिताफीने पकडुन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी आम्हाला त्यांची नावे 1) सौरभ गोपाल कुमरेली, वय 21 वर्षे, रा.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे, शिवनगर, शिवराय पतसंस्थेच्या बाजुला, मांजरी खुर्द पुणे 2) किरण काशीनाथ सुर्यवंशी, वय 26, रा.किनारा हॉटेलच्या मागे, जयभिम नगर, घर नं.06, दापोडी पुणे. (मुळ गाव उजळंब, ता.उस्मानाबाद, जि.उस्मानाबाद) 3) शुभम संतोष कांबळे, वय 22 वर्षे, रा.सोमेश्वरवाडी, सोमेश्वर मंदिराचे मागे, चिंचे झाडाची चाळ, पाषाण पुणे (मुळ गाव- बेंबळी, ता/जि.उस्मानाबाद) असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे कसुन सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचा फरारी साथीदार प्रकाश इरकल, रा.वडावरवाडी पुणे मुळ गाव विजापुर राज्य कर्नाटक याचे सह सुमारे एक वर्षापुर्वी लोअर इंदिरानगर बिबवेवाडी येथील न्यु बालाजी ट्रेडर्स किराणा मालाचे दुकान रात्रीच्या वेळी दुकानाचे शटरचे कुलूप तोडुन शटर उचकटुन दुकानातील काऊंटरच्या ड्रॉवरमधुन एकुण 50,000/- रुपये घरफोडी चोरी केलेचे निष्पन्न झाले. सदर बाबत बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र.57/2020 भा.दं.वि.सं.कलम 454,457, 380 प्रमाणे गुन्हा नोंद असल्यानेे वर नमुद आरोपी 1) सौरभ गोपाल कुमरेली, 2) किरण काशीनाथ सुर्यवंशी व 3) शुभम संतोष कांबळे यांना दाखल गुन्हयाचे कामी दि.23.01.2021 रोजी 16.55 वा. अटक करुन त्यांना अटक मुदतीत मा. न्यायालयामध्ये हजर ठेवुन त्यांची पोलीस कोठडीची रिमांड घेवून रिमांड मुदतीत अधिक तपास करुन त्यांचा फरारी साथीदार प्रकाश विठ्ठल इरकल, वय 22 वर्षे, रा.वडावरवाडी, पुणे मुळ गाव विजापुर राज्य कर्नाटक यास विजापुर, कर्नाटक येथून ताब्यात घेवून अटक करुन तपास करता त्यांनी पुणे शहरामध्ये खालील गुन्हे केलेचे उघडकीस आले आहे.
1) बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र.57/2020 भा.दं.वि.सं.कलम 454,457, 380
2) बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र.458/2020 भा.दं.वि.सं.क.454,457, 380
3) बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र.654/2020 भा.दं.वि.सं.कलम 454,457, 380
4) बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 675/2020 भा.दं.वि.सं.कलम 454, 380
5) वारजे पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.81/2020 भा.दं.वि.सं.कलम 457,380,511
6) वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.2188/2020 भा.दं.वि.सं.कलम 379
7)अलकांर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.1093/2020 भा.दं.वि.सं.कलम 379
8) 16,000/- अंदाजे रु. किं. ची तांबे पितळेची पुजेची भांडी, बुट, शर्ट व रोख रक्कम उत्तमनगर पोलीस ठाणे
9) 70,000/- रु. किं.चे विविध कंपनीचे विविध मॉडेलचे एकुण 7 अँडरॉईड मोबाईल फोन पुणे
शहरातून विविध भागातून चोरी केलेले.घरफ़ोड्या
10) लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.1027/2020 भा.दं.वि.सं.कलम 379 वरील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणणेत आले असून त्यामध्ये 01,15,000/- रु. किं. च्या एकुण तिन मोटार सायकल, 24,000/- रु. किं. चे सोन्या चांदीचे दागिने, 11,700/- रु. रोख रक्कम व 15,000/- रु. किं. ची तांबे पितळीची पुजेची भांडी व साहीत्य व 70,000/- रु. किं. चे मोबाईल हॅण्डसेट असा एकुण 02,35,700/- रु. किं. चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला असून यातील आरोपी यांनी दाखल गन्हयातील चोरी केलेली रोख रक्कमे पैकी काही रक्कम ही चेन व मौज मजा करणे कामी उडवली असुन तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री. राजेश उसगावंकर पुढील तपास करीत आहेत.
सदरची कारवाई ही परिमंडळ 5 चे पोलीस उप आयुक्त मा. नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल झावरे तसेच पोलीस निरीक्षक(गुन्हे) चे अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राजेश उसगावंकर, पोलीस हवालदार शैलेश आलाटे, शाम लोहोमकर, पोलीस अंमलदार अमित पुजारी, श्रीकांत कुलकर्णी, सतिश मोरे, दिपक लोढा, तानाजी सागर, राहूल कोठावळे, अमोल शितोळे, अतुल महांगडे, चेतन कुंभार यांनी केली आहे.