दरोडा व वाहनचोरी पथक -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर सरकारी नोकरीचे आमिष दाखवुन लाखो रुपयांचा गंडा
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – ० ९ / ०७ / २०२१ दरोडा व वाहनचोरी पथक -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर सरकारी नोकरीचे आमिष दाखवुन लाखो रुपयांचा गंडा घालणा – या आरोपीस ठोकल्या
ONLINE PORTAL NEWS
बेडया दिनांक ०७/०७/२०२१ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडील पो.हवा .८०९ शिवतरे , पोना ३०४२ मेंगे , पोना २८८ ताजणे व पोलीस अंमलदार १००१९ ताकपेरे असे स्वारगेट , सहकारनगर , भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे हद्दीत मा.पोलीस आयुक्त साो , पुणे शहर यांनी दिलेल्या आदेशाने रेकॉर्डवरील पाहिजे / फरारी / तडीपार / मोका तसेच इतर गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना वरील स्टाफमधील पोना ३०४२ अतुल मेंगे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमीच्या आधारे भायखळा पोलीस स्टेशन , मुंबई गुन्हा रजि नं ४८६/२०२१ , भादंवि कलम ४०६,४२०,३४ या दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे दिपक कांतिलाल पांचाळ , रा . जांभुळवाडी रोड , पुणे हा त्याचे रहाते घराचे परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती . प्राप्त बातमीचे अनुषंगाने वरील स्टाफ असे दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा त्याचे रहाते घराचे परिसरात थांबुन शोध घेत असताना तो त्याचे रहाते घराचे सोसायटीचे पार्किंग मध्ये दिसुन आल्याने वरील स्टाफने भायखळा पोलीस स्टेशन , मुंबई या पोलीस स्टेशनशी संपर्क करुन वरील दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीबाबत चौकशी व खातरजमा केली असता त्यांनी वरील दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हाच असलेबाबत सांगितल्याने आम्ही स्वतः सोबतचे स्टाफ असे त्यास दाखल गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेवुन दाखल गुन्ह्याबाबत त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर आरोपीस ताब्यात घेवुन भायखळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता भायखळा पोलीस स्टेशन मुंबई येथील अधिकारी व स्टाफ असे नमुद आरोपीस ताब्यात घेणेकरीता दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ , गुन्हे शाखा , पुणे शहर येथे हजर झाल्याने दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे दिपक कांतिलाल पांचाळ , वय ४५ वर्षे , रा.व्यंकटेश लेक व्हिस्टा , सी – विंग , फ्लॅट नं .८०१ , जांभुळवाडी रोड , पुणे यास पुढील तपासकामी पोशि.साताळकर व पोशि.ठाकुर , भायखळा पोलीस स्टेशन , मुंबई यांचे ताब्यात देण्यात आले आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त , श्री अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त , श्री.डॉ. रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , श्री.अशोक मोराळे , मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे , श्री.श्रीनिवास घाडगे , मा.सहा.पोलीस आयुक्त , श्री.सुरेंद्रनाथ देशमुख , ( गुन्हे शाखा -१ ) यांचे मार्गदर्शनाखालील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -१ , गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक , शिल्पा चव्हाण , पोलीस हवालदार , निलेश शिवतरे , पोलीस नाईक , अतुल मेंगे , पोना.धनंजय ताजणे व पोलीस अंमलदार , सुमित ताकपेरे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर यांनी केली आहे .

ONLINE PORTAL NEWS
CRIME REPORTER RAEES KHAN