वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कारवाई ५२,२०,००० / – रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला बनावट नंबर टाकुन अवैध गुटखा / पानमसाला याची वाहतुक करणा
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
प्रेस नोट दि . – १०/०७/२०२१ पोलीस स्टेशन -वाकड वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कारवाई बनावट नंबर टाकुन अवैध गुटखा / पानमसाला याची वाहतुक करणा – या टेम्पोसह ०३ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन ५२,२०,००० / – रु . किंमतीचा मुद्देमाल हस्तगत .
ONLINE PORTAL NEWS 9822331526
मा . पोलीस आयुक्त श्री . कृष्णप्रकाश साो . यांचे अवैध धंदयाबाबत “ झिरो टॉलरन्स या मोहीमे अंतर्गत अवैध धंदयांवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या आहेत . – दि .०७ / ०७ / २०२१ रोजी वाकड पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोहवा . विक्रम कुदळ व प्रशांत गिलबिले यांना रावेत – डांगे चौक या मार्गे निळ्या रंगाची ताडपत्री असलेल्या तांबड्या रंगाचे टाटा कंपनीचे एका टेम्पोमधुन अवैध गुटखा / प्रतिबंधीत पानमसाला वाहतुक करुन विक्रीसाठी नेला जात असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली . बातमीचे अनुषंगाने डॉ . विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी तपास पथकातील अधिकारी / अमलदार यांना कारवाई करणेबाबत आदेश दिले .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
बातमीचे अनुषंगाने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी रावेत – डांगे चौक रोडवर गस्त करीत ब्ल्यु वॉटर हॉटेल , पुनावळे पुणे येथे सापळा लावला . रात्री २३.३५ वा . सुमारास संशयीत टेम्पो रावेत कडुन हंगीग ब्रीज ओलांडून डांगे चौकाचे दिशेने येत असताना हॉटेल ब्ल्यु वॉटर , पुनावळे पुणे येथे त्यास थांबवुन संशयीत टाटा टेम्पो नं . MH18 / AA / 9421 ची तपासणी केली असता टेम्पोमध्ये प्रतिबंधीत विमल पानमसाल्याचे १०० पोती व व्ही १ तंबाखुचे १०० पोती असा माल मिळुन आला . टेम्पोचे कागदपत्रांची पाहणी करता टेम्पोचा मुळ आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन क्र . MH48 / AY / 8254 असल्याचे निष्पन्न झाले .
ONLINE PORTAL NEWS 9822331526
टेपोमधील इसम नामे
( १ ) गणेश वंजी साबळे वय २९ वर्षे ( टेम्पो चालक ) रा . मु.पो. धोंगळे ता . साक्री , जि . धुळे व
( २ ) संदिप गुलाब ठाकरे ( क्लिनर ) वय २७ वर्षे रा . मु.पो. धोंगळे ता . साक्री , जि . धुळे ,
( ३ ) विशाल पाडूरंग लवाळे वय २२ वर्षे रा . मु.पो. उरवडे , ता . मुळशी , जि . पुणे हे प्रतिबंधीत विमल पानमसाला व व्ही १ तंबाखुची तस्करी करताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन
१ ) प्रतिबंधीत विमल पानमसाला ची १०० पोती कि रु ३९ , ६०,००० / – रु २ ) व्ही १ तंबाखु ची १०० पोती कि ४,४०,००० / – रु ३ ) एक टाटा कंपनीचा टेम्पो कि ८,००,००० / – ४ ) चार मोबाईल फोन कि २०,००० / – रु असा एकुण ५२,२०,००० / – रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
नमुद तिन्ही आरोपी विरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. ५५५/२०२१ भादवि ३२८,२७२,२७३,४६५ , ४६७,४६८,४७१,१८८,३४ अन्न सुरक्षा मानदे कावदा २००६ चे कलम २६ ( २ ) ( i ) .२६ ( २ ) ( iv ) सहवाचन कलम ३ ( i ) ( zz ) , साथीचा रोग अधिनियम १८९७ कलम ३ , राष्ट्रीय आपत्ती अधिनियम २००५ चे कलम ५० ( ब ) , महा . कोबीड १९ उपाययोजना २०२० चे कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे . आरोपींना मे . कोर्टात हजर केले असता दि . १३/०७/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करणेत आली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
सदरची कारवाई मा . श्री . कृष्ण प्रकाश साो . पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा . श्री . रामनाथ पोकळे साो . अपर पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा . श्री.आनंद भोईटे सो , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ – २ पिंपरी चिंचवड , मा . श्री . श्रीकांत डिसले साो , सहा . पोलीस आयुक्त , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ . श्री . विवेक मुगळीकर , वरिष्ठ पोलीस निरिक्षक , वाकड पोलीस ठाणे , श्री संतोष पाटील , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , श्री . सुनिल टोणपे पोलीस निरीक्षक ( गुन्हे -२ ) , तपास पथकातील सपोनि संतोष पाटील , पोलीस अमलदार राजेंद्र काळे , बाबाजान इनामदार , विभीषण कन्हेरकर , विक्रम कुदळ , विजय गंभिरे , नितीन ढोरजे , बापुसाहेब धुमाळ , जावेद पठाण , प्रशांत गिलबीले , वंदु गिरे , नितीन गेंगजे , प्रमोद कदम , अतिश जाधव , सुरज सुतार , मधुकर कोळी , श्याम बाबा , कल्पेश पाटील , तुषार गाडेकर , जितेंद्र उगले , नुतन कोडे , यांनी केली आहे .
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526