बेकायदा टर्मीन इंन्जेक्शनची विक्री, हडपसर तपास पथकांची कामगिरी,,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
हडपसर, माळवाडी परिसरात बेकायदा टर्मीन इंन्जेक्शनची विक्री; हडपसर तपास पथकाकडून एकाला अटक,
दिनांक ०८/०१/२०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, यांना प्राप्त गुप्त बातमी वरून मा. रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन यांच्या आदेशाने तपासपथक प्रभारी अधिकारी सहा पो. निरी अर्जुन कदळे, पोलीस उप-निरी. अविनाश शिंदे आणि तपासपथक अंमलदार यांनी औषध निरीक्षक श्रीमती श्रुतीका जाधव यांचे सह मिळालेल्या,
पुणे : (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान,
हडपसर, माळवाडी परिसरात बेकायदेशिरपणे मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन ) इंन्जेक्शनची विक्री करणाऱ्यास हडपसर तपास पथकाकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन ) इंन्जेक्शनच्या ३० बाटल्या व एक मोटारसायकल असा ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. किरण विठ्ठल शिंदे (वय २१, रा. कृष्णकुंज अपार्टमेंन्ट, स्वामीनारायण मंदिरामागे, नऱ्हे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भादवि कलम ३२८,२७३,२७६,३३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अतुल पंधरकर यांनी फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन असताना त्याच्यावर खुनाचा गुन्हा देखील दाखल झालेला होता. पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांना खबऱ्याने आरोपी शिंदे हा हडपसर परिसरातील माळवाडी येथे मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन ) इंन्जेक्शनची विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे आणि अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव यांच्या पथकाने आरोपीच्या शोधासाठी सापळा रचला. पोलीस पथकाने अन्न व औषध निरीक्षक श्रुतीका जाधव यांची मदत घेतली. त्यांना सोबत घेऊनच पोलिसांचे पथक रवाना झाले. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याला पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील पिशवीत मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन ) इंन्जेक्शनच्या ३० बाटल्या मिळून आल्या. त्याने ‘या औषधापासून नशा केली जाते. तो हे इंजेक्शन ५५० रुपयांना एक याप्रमाणे विकत असल्याची माहिती पोलिसांना दिली.
त्याच्याकडे कोणताही औषध विक्री परवाना नाही. तसेच, औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने अनाधिकाराने बेकायदेशीररित्या हे औषध विक्रीकरिता स्वत:च्या ताब्यात घेऊन त्याची बेकायदा विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त साो पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा साो, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग व मा. आर राजा साो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. रविंद्र शेळके साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. विश्वास डगळे साो, पोनि. (गुन्हे), श्री. संदीप शिवले साो, पोनि. (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, अतुल पंधरकर, भगवान हंबर्ड, सचिन गोरखे, अजित मदने, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.पुढील तपास सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे करीत आहेत.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in