भरदिवसा व्यापा-यास द्रृश्यम स्टाईलने लुटणा-या मास्टरमाइंड यास समर्थ पोलीसांनी केले अटक २५ लाख रुपये जप्त.समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकांचे कामगिरी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व टीम ची धडाकेबाज कामगिरी..

भरदिवसा व्यापा-यास द्रृश्यम स्टाईलने लुटणा-या मास्टरमाइंड यास समर्थ पोलीसांनी केले अटक २५ लाख रुपये जप्त.समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकांचे कामगिरी.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

कामावरून काढले म्हणून केली चोरी मनातून राग ठेवला होता.

पुण्यात भरदिवसा व्यापार्‍यास कोयत्याचा धाक दाखवुन त्याच्याकडील ४७ लाख रूपये दृश्यम स्टाईलने लुटणार्‍या मास्टरमाइंडला समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व टीम नी अटक केली आहे.

(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान ऑनलाईन पुणे:-

समर्थ पोलीस स्टेशनच्या हददीत दिनांक २३/०३/२३ रोजी सकाळी ११.३० या दरम्यान दोन इसमांनी कोयत्याचा धाक दाखवुन एक व्यापा-याचे ४७ लाख रुपये लुटल्यामुळे समर्थ पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३९४, ३४१.३४ महाराष्ट्र अधिनियम कलम ३७(१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार सहा. पोलीस आयुक्त सतिष गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली समर्थ तपास पथकाने तात्काळ तपास सुरु केला..

यातील फिर्यादी मंगलपुरी भिकमपुरी गोस्वामी वय ५५ रा. सिटी सर्व्हे नं २०८ मंगळवार पेठ हे पन्ना मार्केटिंग एजन्सी पिंपरी चौक येथे मागील ३० वर्षापासून कामास होते. फिर्यादी हे पन्ना एजेन्सीमध्ये जमा होणारी रोख रक्कम दररोज सकाळी ११.०० वा. ते १२.०० वा. चे सुमारास बँक ऑफ इंडिया, शाखा रास्ता पेठ, पुणे येथे भरण्यासाठी जातात, दिनांक २३/०३/२०२३ रोजी ११.३० वा. चे सुमारास फिर्यादी है नेहमीप्रमाणे ४७ लाखाची रोख रक्कम ही स्कुटर वरुन जात असताना आझाद चौक येथे आले असता मोटार सायकलवरुन दोन आरोपी यांनी येवुन कोयत्याचा धाक दाखवुन फिर्यादी यांचेकडील ४७ लाख रुपये जबरदस्तीने लुटुन घेवुन पळून गेले होते.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा.सहा.पोलीस आयुक्त सतिश गोवेकर फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनखाली समर्थ, फरासखाना, डेक्कन, विश्रामबाग, शिवाजीनगर या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील व पळुन गेलेले दिशेचे जवळ जवळ पुर्ण पुणे शहरातील ५०० च्या वर सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता आरोपी हे गहुंजे गाव, पिपरी चिंचवड या परीसरात पळुन गेल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर आरोपी यांनी वापरलेले अॅक्टीव्हा स्कुटरचा शोध घेणेकामी आर.टी.ओ पुणे येथुन पुणे शहर व आसपासच्या भागातील स्कुटरची माहिती कावुन त्याचा शोध घेवुन माहिती घेण्यात आली होती. परंतु आरोपी यांनी गुन्हा करताना सर्व प्रकारची योग्य ती काळजी घेतलेली असल्याने आरोपी हे निष्पन्न होत नव्हते. त्यानंतर गुन्हा करण्यापुर्वी आरोपी हे कोणत्या दिशेने आले याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता, एक संशयीत रिक्षा सदर त्याठिकाणी फिरतांना आढळुन आली. त्या एका फुटेजचा आधार घेवुन सपोनि प्रसाद लोणारे व त्यांच्या पथकाने रिक्षाची माहीती मिळवून सदर रिक्षा चालकास ताब्यात घेतले व सदरचा गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयातील वापरलेली स्कुटर चालविणाऱ्या आरोपीचे नाव १) किरण अशोक पवार राह. अप्पर, एम. आय. टी. कॉलेजजवळ, बिबवेवाडी, पुणे व पाठीमागे बसलेला २) आकाश कपील गोरड रा. अप्पर बिबवेवाडी सध्या सोमाटणे हे दोघे असल्याचे निष्पन्न केले. दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील आहेत व त्याचे सोबत तिसरा व्यक्ती जो रिक्षामध्ये दिसत होता त्याचेबाबत तपास केला असता तिसरा व्यक्ती हा आरोपीचा मित्र नामे ३) ऋषीकेश गायकवाड रा. बी-३७/०१, इंदिरानगर, अप्पर, व्ही.आय.टी कॉलेजजवळ, बिबवेवाडी, पुणे ३७ हा असल्याचे निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेण्यात आले.

ऋषीकेश गायकवाड याचेकडे सखोल तपास केला असता गायकवाड हा सन २०१९ पासुन पन्ना एजन्सीमध्ये गॉरड के फिलीप्स इंडिया लि. या कंपनी मार्फत पन्ना एजन्सीकडे सिगरेट विक्री करणेकरीता सेल्समन म्हणुन काम करीत होतो. आरोपी गायकवाड याने भांडण केल्यामुळे त्यास ऑक्टोबर २०२२ मध्ये कामावरुन काढले होते. ऋषीकेश गायकवाड यास पन्ना एजन्सी मध्ये नोकरीस असल्याने त्याला पन्ना एजन्सी मध्ये दररोज २० ते २५ लाखापेक्षा जास्त रोख रक्कम ही फिर्यादी भरण्यास जातो व त्याचा बँकेतू जाण्याचा वेळ माहिती होती. त्यानंतर ऋषीकेश गायकवाड याने किरण पवार व आकाश गोरड याचे मदतीने दुश्यम फिल्म स्टाईलने पैसे लुटण्याचा प्लॅन केला. या आरोपी यांनी सदर भागाची माहीती घेवुन चार दिवस रेकी केली व पळून जाण्यासाठी कॅमेरे नसलेले रोडही पाहुन ठेवले होते.

दिनांक २२/०३/२०२३ रोजी गुढीपाडवा असल्याने बँका बंद असतात. त्यामुळे दिनांक २३/०३/२०२३ रोजी दोन दिवसाची मोठी रक्कम लुटण्याचा प्लॅन करुन दिनांक २३/०३/२०२३ रोजी सकाळी ०९.०० वा. पन्ना एजन्सी जवळ रिक्षामध्ये येवुन किरण पवार व आकाश गोरड यांना पैसे घेवुन जाणारे व्यक्तीस दाखविला व आरोपी ऋषिकेश गायकवाड हा रिक्षा घेवुन परत घरी निघुन गेला व स्वताच्या घरात असलेल्या कॅमेरेखाली दिवसभर बसुन राहीला…

मास्टरमाइंड ऋषीकेश गायकवाड यांचेकडुन तपासामध्ये आतापर्यत २५ लाखाची रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली अॅक्टिव्हा स्कुटर ही हस्तगत करण्यात आली आहे. आरोपी ऋषीकेश गायकवाड याने सदर गुन्हयाचे प्लॅन करुन त्याचा मित्र किरण अशोक पवार व आकाश कपील गोरड याचे सोबत द्रुश्यम स्टीईनले सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. उर्वरीत दोन्ही आरोपींचा शोध चालु आहे.

सदर गुन्हयाचा तपास समर्थ पोलिस स्टेशन वपोनि / रमेश साठे हे करीत आहे.

सदरची कामगिरी ही मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग. मा. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १ पुणे शहर, मा. श्री. सतिश गोवेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रमेश साठे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे. श्री प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेनुसार समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक / प्रसाद लोणारे, पोउनि सौरभ माने, पोउनि सुनिल रणदिवे, पोउनि मिरा त्रंबके, पोउनि सौरभ थोरवे, पोउनि दिपक यादव, सपोनि राकेश जाधव, पोउनि निलेश मोकाशी, पोउनि राकेश सरडे, सपोनि भोलेनाथ अहीवळे, पोलीस अंमलदार सपोफी/ दत्तात्रय भोसले, पोहवा / गणेश वायकर, पोना / रहिम शेख, हेमंत पेरणे, अमोल शिंदे, मंगेश जाधव, शरद घोरपडे, पोअं/ज्ञानेश्वर सुर्यवंशी, पोअं/ रिकी भिसे, मपोअं/ निलम कर्पे, पोअं/ जितु पवार, मपोअं/ प्रियंका खेडेकर, मपोअं/योगिता आफळे, पोअं/ कुडाळकर, पोना / प्रविण पासलकर, पोना/ वैभव स्वामी, पोना/ मयुर भोसले, पोअं/ संदिप पवार, पोहवा / शरद गायकवाड, पोअं/ संदिप तळेकर, सागर घाडगे, मयुर भोसले, आशीष खरात, अर्जुन थोरात, बशीर सैयद, रणजित फडतरे, सचिन गायकवाड यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान ऑनलाईन पुणे:-

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *