समर्थ पोलीसांची एकाच दिवशी दुहेरी कामगिरी.

Sufiyan Khan crime reporter ACS

दिनांक – २८/१०/२०२१ समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर समर्थ पोलीसांची एकाच दिवशी दुहेरी कामगिरी ” घरफोडी व वाहन चोरीतील चोरटे जेरबंद .

दि .२७ / १० / २०२१ रोजी फिर्यादीने त्यांचे रास्ता पेठ पुणे येथील रहाते बिल्डींगचे पार्कींग मधील त्यांचे हायड्रोलीक होस पाईप व्यवसायाचे सामान चोरी झालेबाबत तक्रार दाखल केली होती . तसेच समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत संतकबीर चौक , नानापेठ पुणे येथून काही महिन्यापूर्वी अॅक्टीवा गाडी चोरी झालेबाबत फिर्यादीने तक्रार दाखल होती . सदर गुन्ह्याचा तपास चालु होता . समर्थ पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक , यांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हे प्रतिबंधक गस्त व नाकाबंदी नियमित करीत असतात . तपास पथकातील काही अंमलदार हे गस्त करीत होते . बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमी प्रमाणे दोन संशयीत घरफोडी चोर हे उतारा चौक , रास्ता पेठ , पुणे येथे बसले असल्याचे माहिती मिळालेवरुन त्याठिकाणी जावुन बातमीदाराने सांगितल्या प्रमाणे बातमी मधील इसमांची खात्री करून त्यांना ताब्यात घेण्यात आले . त्यांना त्यांचे नांव पत्ता विचारता त्यांनी आपले नांव

१ ) राकेश राजू घाडगे , वय २१ वर्षे , रा . पत्र्याची चाळ , भवानी पेठ , पुणे व

२ ) रामा देवा चाकले , वय १९ वर्षे , रा . दारूवाला पूल , सोमवार पेठ , पुणे

असे असल्याचे सांगीतले . त्यांना विश्वासात घेवून दाखल गुन्हयाबाबत विचारपूस केली असता , त्यांनी दि . २७/१०/२०२१ रोजी दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली देवून त्यांनी सदर घरफोडीतील रु ३०,००० / – चा मुद्देमाल काढून दिला . याबाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल असुन , सदर गुन्हयाचा तपास मपोउपनिरी ज्योती कुटे या करीत आहेत . समर्थ पोस्टेला दाखल असलेल्या वाहन चोरीतील आरोपींचा शोध घेणेकरीता बारणेरोड , मंगळवार पेठ भागात दि . २७/१०/२०२१ रोजी नाकाबंदी आयोजित करण्यात आली होती . या नाकाबंदी दरम्यान बीट मार्शलसह पोलीस अंमलदार शुभम देसाई व महेश जाधव वाहन तपासणी करीत असताना समोरुन येणा – या एका अॅक्टीवावरील चालकाच्या संशयास्पद हालचाली वाटल्याने त्यास थांबवुन त्याचेकडे वाहनाची कागदपत्राबाबत विचारणा केली , परंतु त्याने वाहनाचे कागदपत्रे न दाखविता उडवाउडविचे उत्तरे दिल्याने त्याचे विरुध्द जास्त संशय वाटला . त्यास त्याचे नांव पत्ता विचारले असता महादेव राजू दोडमनी , वय २५ वर्षे , रा . यमुनानगर , सम्राट चौक , वडगांव शेरी असे असलेचे सांगीतले . त्याचे ताब्यात असलेली अॅक्टीवा हि समर्थ पोलीस स्टेशन गुरनं . ४६/२०२१ भादविक . ३७९ अन्वये दाखल गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास गुन्ह्यातील गाडीसह मिळून आलेने त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे . सदर गुन्हयाचा तपास पो हवा . नितीन धोत्रे करीत आहेत . तसेच त्यास अधिक विश्वासात घेवून त्याचेकडे तपास केला असता त्याने दोन महिन्यापूर्वी सेव्हन लव्हज चौक , शंकरशेठ रोड , पुणे येथून हिरो होंडा स्प्लेंडर प्लस गाडी चोरी केलेबाबत सांगीतलेने ती जप्त करण्यात आली आहे . सदर बाबत खडक पोलीस स्टेशन गुरनं . ३९५ / २०२१ भादविक ३७९ अन्वये गुन्हा दाखल आहे . सदर कारवाईत नाकाबंदी व गस्त दरम्यान एकाच दिवशी एकुण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत .

सदरची कामगिरी ही श्री . राजेंद्र डहाळे , मा . अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , श्रीमती प्रियंका नारनवरे , मा . पोलीस उप आयुक्त , परिमंडळ – १ , पुणे शहर , श्री . सतिश गोवेकर , मा . सहाय्यक पोलीस आयुंक्त , फरासखाना विभाग , पुणे श्री विष्णु ताम्हाणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , उल्हास कदम , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहा . पोलीस निरीक्षक संदीप जोरे , म . पो . उपनिरी ज्यांती कुटे , पोलीस हवालदार संतोष काळे , सुशील लोणकर , नितीन धोत्रे , सुभाष पिंगळे , सुभाष मोरे , हेमंत पेरणे , विठ्ठल चोरमले , शुभम देसाई , महेश जाधव , निलेश साबळे , शांताराम तळपे , श्याम सुर्यवंशी यांनी केली आहे .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *