रेकॉर्डवर पाहिजे असलेल्या आरोपीला पोलिसांनी केली अटक. युनिट १ , गुन्हे शाखा ची कामगिरी .

ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक- २९ / १० / २०२१ फसवणुकीच्या गुन्ह्यात ७ वर्षापासुन पाहिजे असलेला गुन्हेगार युनिट – १ , गुन्हे शाखा , पुणे शहर यांचेकडून जेरबंद .

दि . २३/०५/२०१४ रोजी वडकी येथे में पामोसा ट्रेड इंडीया प्रा . लिमिटेड गोडाऊनमध्ये इसम नामे राकेश मुरलीधर नायर व ईतर यांनी सदर गोडाऊनमध्ये शेतीवरील खत विक्रीचा कोणताही परवाना नसताना स्वतःच्या खताचे पॅकिटवर बनावट नावाचे लिहीलेले लेबल लावुन बोगस व अवैद सेद्रीय खताचा साठा किं रु ३,०१,३६५ / – चा माल विक्री करता ठेवला म्हणुन श्री सुभाष पांडुरंग गावडे विभागीय कृषी सह संचालक कृषीभवन शिवाजीनगर पुणे यांनी म्हणुन आरोपी राकेश मुरलीधर नायर व त्याचे इतर साथिदार यांचेवर लोणीकाळभोर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक- १९१ / २०१४ भादवि कलम ४२० खत नियंत्रण आदेश १९८५ चे कलम ७ , ८ , १९ , २१,३५ व जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . त्यापैकी काही आरोपी दाखल गुन्हयांत अटक करण्यात आले होते सदर गुन्ह्यात आरोपी विजय पवार हा गुन्हा दाखल झाले पासुन सुमारे ०७ वर्षापासुन फरार होता . यातील फरार आरोपी हा आपले अस्थीत्व लपवुन आयुष्य जगत असल्याबाबत पोलीस अंमलदार · आमेल पवार यांनी गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळावुन तांत्रीक विश्लेषण करुन तो बावधन येथे नेहमी येत असल्याचे दिसुन आल्याने तेथे पाळत ठेवुन सापळा लावला . सदर गुन्हयांत ७ वर्षापासुन फरार असलेला आरोपी नामे विजय पवार हा त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी बावधन येथे येणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवून परवानगीने युनिट १ , गुन्हे शाखा , पुणे शहर पथकाकडील स्टाफसह बातमीप्रमाणे जावुन नमुद आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव विजय जगन्नाथ पवार वय ४५ वर्षे रा . सी ६०१ मारवल सेल्वा सोसायटी बावधन पुणे असे असल्याचे सांगितले . त्याचेकडे लोणीकाळभोर पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांस विश्वासात घेवुन तपास करता त्याने दाखल गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबुल केल्याने आरोपीस पुढील कारवाई कामी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन , पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे .

सदरची कामगिरी मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री रामनाथ पोकळे , मा . पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे- १/२ श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदशनाखाली – युनिट १ , गुन्हे शाखा , पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे , पोलीस अंमलदार अमोल पवार , अजय थोरात , इम्रान शेख , आय्याज दड्डीकर , तुषार माळवदकर , महेश बामगुडे , मिना पिंजण यांनी केली आहे .

( शैलेश संखे ) वरीष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १ , गुन्हे शाखा , पुणे शहर.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ACS POLICE CRIME SQUAD

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *