हौसमौज करणाऱ्या रिक्षावाल्या सराईत चोरटयास समर्थ पोलीसांच्या तपास पथकाने केले जेरबंद .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

हौसमौज करणाऱ्या रिक्षावाल्या सराईत चोरटयास समर्थ पोलीसांच्या तपास पथकाने केले जेरबंद समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत .

दिनांक १२/०७/२०२२ रोजी सायकांळी ०७.०० वा . ते ०७.१५ वा . दरम्यान कमला नेहरू हॉस्पिटल समोर , सोमवार पेठ , श्रीकृष्ण हॉटेल पुणे समोरील पॅसेजमध्ये राज पान स्टॉल नावाची टपरीमधील कॅश काऊंटरच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेली रोख रक्कम रु .५००० / – रु . ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने मालकाची नजर चुकवून चोरली होती म्हणून सदर बाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गुं . रं.नं. १२४ / २०२२ भावावेक . ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ..

दाखल गुन्हयाच्या तपासामध्ये वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अंमलदार श्याम सुर्यवंशी यांना त्यांचे खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की , नमुद गुन्हयातील कॅश चोरी केलेला इसम हा रिक्क्षा नंबर एमएच १२ आरपी ४९३६ मध्ये संशयीतरीत्या बसला असून त्याने साधारण ०८ ते १० दिवसापूर्वी कमला नेहरू हॉस्पीटल जवळून एका पान टपरीमधील गल्ल्यातून काही रक्कम चोरली होती . असे कळताच सदरची बातमी मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रमेश साठे यांना कळविली असता ,त्यांनी सुनिल रणदिवे पोलीस उप निरीक्षक यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिलेने , त्यांनी तपास पथकातील पोलीस अंमलदार यांचे मदतीने बातमीमधील इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने नाव

१ ) मयुर शशीकांत कदम , वय ३२३ वर्षे , रा- एसआर बिल्डींग , सी विंग , फ्लॅट नंबर ६०४ , शिंदे वस्ती हडपसर , पुणे असे असलेचे सांगीतले .

त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे तपास केला असता त्याने त्याचे रिक्षा मधून ०८ ते १० दिवसापूर्वी राज पान स्टॉलमधून कॅश चोरलेबाबतची कबूली दिली . सदरची रक्कम त्याने दारू पिण्यासाठी आणि आषाढ पार्टी साजरी करण्यासाठी खर्च केलेबाबत सांगीतले . सदर आरोपीवर या अगोदर हडपसर पोस्टे गुरनं . ८२३/२०१२ भादविक ३५४. सह पोक्सो ८,१२ अन्वये व हडपसर पोस्टे गुरनं . ६९४/२०२१ भादविक ४५४,४५७,३८०,३४ अन्वये गुन्हे दाखल आहेत . –

सदरची कामगिरी ही मा .राजेंद्र डहाळे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , मा . श्रीमती प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ १ पुणे शहर , मा . श्री . सतिश गोवेकर , सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे श्री . रमेश साठे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , उल्हास कदम , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहा . पोलीस निरीक्षक प्रविण जाधव , पोलीस उप निरीक्षक सुनिल रणदिवे , पोलीस अंमलदार दत्तात्रय भोसले , गणेश वायकर , प्रमोद जगताप , रहिम शेख , सुभाष पिंगळे , हेमंत पेरणे , श्याम सुर्यवंशी , लखन शेटे यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *