हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ५० हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

क्राईम न्यूज :५० हजार रुपये लाच घेताना हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात.

आर्थिक व्यवहारांमध्ये अडकलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता.१९) रंगेहाथ पकडले आहे.

पुणे : ऑनलाइन – फसवणूक प्रकरणातील २० लाख रुपये मिळवुन देण्यासाठी ५० हजार रुपये लाच स्विकारताना हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सागर दिलीप पोमन ( वय -३३ ) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले . सागर पोमन यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे . पुणे एसीबीने ही कारवाई मंगळवारी ( दि . १९ ) रात्री १०.४० च्या सुमारास कोरेगाव पार्क येथील मोका हॉटेलमध्ये केली .

याप्रकरणी उत्तर प्रदेशातील गोमतीनगर येथील ३२ वर्षीय तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे . पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन हे हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असून तक्रारदार हे व्यावसायिक आहेत . तक्रारदार यांनी फसवणुक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती . तक्रारदार यांचे २० लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी पोमन यांनी ५० हजार रुपये लाच मागितली . मात्र , तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली . पुणे एसीबीने तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन यांनी तक्रारदार यांचे फसवणुक झालेले वीस लाख रुपये परत मिळवुन देण्यासाठी ५० हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले .

तसेच लाचेची रक्कम कोरेगाव पार्क येथील मोका हॉटेलमध्ये स्विकारण्याचे मान्य केले . पथकाने मंगळवारी हॉटेलमध्ये सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून २००० रुपयांच्या २५ नोटा लाच स्वरुपात स्विकारताना सागर पोमन यांना रंगेहात पकडले .

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली .

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी , असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे . तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा .

Web Title :- पुणे एसीबी ट्रॅप | सागर पोमण यांच्यावर , हडपसर पोलीस स्टेशन पुणे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *