ट्रॅक्टर -ट्रॉली , टेम्पो व वाहन चोरी करणारी आरोपीला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२ ने केली अटक .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ट्रॅक्टर -ट्रॉली , टेम्पो व वाहन चोरी करणारी आरोपीला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२ ने केली आता .

दरोडा पथक – २ ची उल्लेखनीय कामगिरी ट्रॅक्टर -ट्रॉली , टेम्पो व वाहन चोरी करणारी आंतर जिल्हा टोळीस पोलिसांनी जेरबंद करून ५ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस ..

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२ चे अधिकारी व अंमलदार वाहन चोरीस आळा घालणे करिता तसेच पथकाकडे तपासास असलेला कोंढवा पो.स्टे.गु.र.नं.७३६ /२०२२ भादवि कलम ३७९,३४ या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार अमोल सरतापे,संदीप येळे व राहुल इंगळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की इसम नामे

१) गणेश अरुण राऊत, वय ३४ वर्ष रा. राऊत वस्ती,पेनुर ,ता.मोहोळ जि. सोलापूर

२)धनाजी नागनाथ लोकरे, वय ३७ वर्ष ,रा.लवूळ ता.माढा,जि. सोलापूर

३)आबा दत्तात्रय डोके वय २४ वर्षे, रा.टेकळे वस्ती, पेनुर,ता. मोहोळ,जि. सोलापूर यांचे कब्जात वृंदावन मंगल कार्यालय थेऊरगाव तालुका हवेली जिल्हा पुणे

येथे वाहनाचा नंबर खोडलेला एक महिंद्रा ट्रॅक्टर व नंबर प्लेट नसलेली एक मारुती सुझुकी वॅगनार ही संशयितरित्या मिळून आल्याने त्यांना स्टाफचे मदतीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या कब्जात मिळून आलेली वाहने ट्रॅक्टर हा कोंढवा पो.स्टे गु.र.नं. ७३६/२०२२ या गुन्ह्यातील चोरीस गेलेला असल्याचे निष्पन्न झाले तसेच वॅग्नर कार हिचेबाबत लोणी काळभोर पो. स्टे. येथे गु.र.नं.२९९/२०२२,भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली.

त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करून पुढील तपास केला असता त्यांच्या मदतीने त्याचा आणखी एक साथीदार आरोपी समाधान उर्फ माऊली शिवाजी चौरे, वय ३२ वर्ष रा. तामडाग वस्ती, पेनुर ,ता. मोहोळ जि.सोलापूर याचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आलेली आहे.


सदर आरोपी यांच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्यांनी वरील वाहने त्यांचा आणखी एक साथीदार आरोपी विजय बोरवडे राह. बीड याने वाहने चोरी करणेकरीता सॅन्ट्रो कार वरील आरोपींना देऊन वरील प्रमाणे वाहने पुणे शहरातुन चोरी करून आरोपी विजय बोरवडे रा. बीड याचे बीड येथील साईनाथ मोटर्स दुकानावरती विकणेसाठी दिली अशी माहीती तपासात निष्पन्न झाली .सदर ३ चारचाकी वाहने महिन्द्रा बोलेरो जीप ,पिकअप जीप व अशोक लेलन दोस्ती टेम्पो अशी वाहने अटक आरोपी गणेश राऊत याने दिले कबुली निवेदनापमाणे पंचनाम्याने २ पंचा समक्ष जप्त करण्यात आलेले आहेत.

तसेच वरील ५ वाहने चोरी करण्यासाठी रेकी करणारा त्यांचा पाहीजे साथीदार आरोपी अक्षय उर्फ भैय्या चव्हाण, राह . हडपसर,पुणे हा चोरीचे वाहनाचे व ठिकाणाची रेकी करून तशी माहिती आरोपींना देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर आरोपी यांच्याकडून पुणे शहरातील खालील प्रमाणे ५ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

       

१) कोंढवा पो.स्टे.गु.र.नं. ७३६/२०२२ भादवि कलम ३७९

२) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ६५६/२०२२ भादवि कलम ३७९

३) लोणी काळभोर पो.स्टे. गु.र.नं.२९९/२०२२,भादवि कलम ३७९
4) लोणीकंद.पो.स्टे.गु.र.नं.736/२०२२ भादवि कलम ३७९
५) लोणीकंद पो .स्टे.गु.र.नं.३७०/२०२२ भादवि कलम ३७९


वरील गुन्ह्यातील १मारुती सुझुकी वॅगनार, १महिंद्रा पिकप, १ महिंद्रा बोलेरो, १ ट्रॅक्टर व ट्रॉली, १ अशोक लेलँड दोस्ती अशी एकूण ५ वाहने किं.रु.१२,१३,८६९/-ची जप्त करण्यात आलेली आहेत.


सदर गुन्ह्यात विजय बलभीम बोरवडे व अक्षय उर्फ भैया चव्हाण हे पाहिजे आरोपी असून ते मिळून येताच त्यांनादेखील अटक करण्याची तजवीज ठेवली आहे. सदर गुन्हाचा तपास चालू आहे.


सदरची कारवाई ही ,मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे सो, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे सो, मा सहा पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री नारायण शिरगावकर सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर सपोनि विवेक पाडवी व पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे,अशोक आटोळे, राजेश लोखंडे, विनायक रामाने,मनोज खरपुडे, शिवाजी जाधव गणेश लोखंडे, सुदेश सपकाळ, अमोल सरतापे,राहुल इंगळे,संदीप इंगळे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर यांनी केलेली आहे.


(सुनील पंधरकर ) पोलीस निरीक्षक

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा ,पुणे शहर

   

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *