दुचाकी भाडयाने घेवून परस्पर विक्री करून फसवणूक करणाया गुन्हेगारांना समर्थ पोलीस स्टेशनने केली अटक .

ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक — ३१/०८/२०२१ समर्थ पोलीस स्टेशन , पुणे शहर दुचाकी भाडयाने घेवून परस्पर विक्री करून फसवणूक करणा – या गुन्हेगारांना केली अटक

श्राईड इंडीया प्रा.ली. या धानोरी येथील दुकानातून इलेक्ट्रीक बाईक भाडयाने देण्याचे काम चालते . दि . १६/०८/२०२१ रोजी पासून ते आज पावेतो सदर दुकानातून तीन बाईक दुकान मालकाने आठ दिवसासाठी नानापेठ येथे भाडयाने दिल्या होत्या . भाडयाची मुदत संपल्यानंतर सदर बाईक परत करणे आवश्यक असताना सुध्दा त्या परत न केल्याने दुकान मालकाने संबंधित व्यक्तिकडे फोनवर संपर्क केला असता , आज देतो , उदया देतो अशी उडवाउडविची उत्तरे देत होता व नंतर फोन बंद केलेने फिर्यादीस त्यांची फसवणूक झालेची खात्री झालेने दि . २९ /८/२०२१ रोजी समर्थ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेवरून , तक्रारी प्रमाणे सखोल चौकशी करून , तक्रार दाराची फसवणूक झालेचे निष्पन्न झालेने , तसेच तक्रार दाराने फिर्याद दिलेने त्यावरून समर्थ पोलीस स्टेशन येथे गुरनं . १५०/२०२१ भादविक . ४०६,४२०,४११,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे . सदर गुन्हयाचा तपास सपोनिरी संदीप जोरे हे करीत आहेत . सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत असतांना गुन्हयातील आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून भाडयाने घेतलेल्या इलेक्ट्रीक बाईक हया पिंपरी चौक , नानापेठ , पुणे येथे प्रत्येकी ८००० / – रू . किंमतीत परस्पर विक्री केल्या आहेत . सदरच्या फसवणुकीच्या गुन्हयात आरोपी नामे

१ ) अरीश रेमंड धवर , वय ३१ वर्षे , रा . लक्ष्मी रेसीडेंसी , पठारे वस्ती , शिवशंभो पार्क जवळ , रुम नं . २०२ , दुसरा मजला लोहगांव पुणे मुळ रा . ११/१ टाटा कॉलनी , ताडदेव , एसी मार्केट जवळ , मुंबई ,

२ ) अंबरेश शांतनूर बिदनूर , वय ३३ वर्षे , धंदा नोकरी , रा . लेन नं .२ , पठारे वस्ती , लोहगांव , पुणे मुळ रा . गुलबर्गा , राज्य कर्नाटका

३ ) नरेंद्र विजय पुरुड , वय ३७ वर्षे , धंदा व्यवसाय , रा . ४४१ नानापेठ पुणे यांना अटक केली आहे .

विशेष म्हणजे नरेंद्र पुरुड हा नानापेठ जवळील रास्तापेठ येथे नरेंद्र मोटर्स या नावाने दुचाकी खरेदी विक्रीचे सदरच्या तीनही इलेक्ट्रीक बाईक हया नानापेठ , पुणे येथे असलेबाबत पो.हवा . रणजित ऊबाळे यांना माहिती मिळाली होती . सदरच्या तीनही बाईक किं . रु . ९ ०,००० / – गुन्हयाचे पुरावेकामी पंचनाम्याने जप्त करण्यात आल्या आहेत . आरोपींना सदर इलेक्ट्रीक बाईकला जीपीएस सीस्टीम आहे . याबाबत माहीती नव्हती , त्यामुळे ते अगदी बिनधास्तपणे बाईकचा व्यवहार करीत होते . पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून व्यापा – यांना व नागरीकांना आव्हान करण्यात येत आहे की , शासनाने वाहन खरेदी विक्री संबंधी निर्गमीत केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करूनच व्यवहार करावेत अन्यथा आपली अशाच प्रकारे फसवणूक होवू शकते तसेच कायदेशीर कारवाई सुध्दा होवू शकते .

ACS POLICE CRIME SQUAD

सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , श्री राजेंद्र डहाळे , मा.पोलीस उप आयुक्त , परिमंडळ १ पुणे शहर . श्रीमती प्रियंका नारनवरे , मा सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे श्री . सतिश गोवेकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , श्री . विष्णु ताम्हाणे , उल्हास कदम , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहा . पोलीस निरीक्षक संदीप जोरे , सपोउपनिरी सतिश भालेराव , पोलीस अंमलदार रणजीत ऊबाळे , संतोष काळे , सुशील लोणकर , सुभाष पिंगळे , हेमंत पेरणे , शुभम देसाई , सुभाष मोरे , निलेश साबळे , विठ्ठल चोरमले , महेश जाधव , यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *