गॅस सिलेंन्डर डिलिव्हरी करणार या इसमास कोयत्याचा धाक दाखवुन जबरदस्तीने पैसे घेऊन तडीपार आरोपीला पोलिसांनी केली अटक .

दिनांक -३०/०८/२०२१ खडक पोलीस स्टेशन पुणे शहर भारत गॅस सिलेंन्डर डिलेव्हरी करणा – या इसमास कोयत्याचा धाक दाखवुन त्याचेकडुन जबरदस्तीने पैसे काढुन घेणा – या तडीपार गुन्हेगारास अटक

सदर बाबत अधिक माहिती अशी की , फिर्यादी नामे मांगुसींग रामसिंग मांगलिया हे भारत गॅस सिलेंन्डर नाना पेठ , भवानी पेठ , सिंहगड पसिरातील हॉटेल मध्ये डिलेव्हरी करण्याचे काम करीत असुन दिनांक २८/०८/२०२१ रोजी सकाळी ०६/०० वा.सुमारास मदिना हॉटेल , चुडामण तालीम चौक , भवानी पेठ पुणे येथे गॅस डिलेव्हरी देवुन वैजनाथ भुवन , अमृततुल्य चुडामन तालीम चौक पुणे येथे चहा पित थांबले असतांना ते ओळखत असलेला सराईत गुन्हेगार आरबाज / बबन शेख याने त्यांना आवाज देवुन तो राहत असलेल्या ओवेरा एन्क्लेव्ह सोसायटी ३८६ , भवानी पेठ , बच्चुभाईवाडा पुणे येथून नेवुन त्यांना कोयता धाक दाखवुन त्यांचेकडील १०,००० / – रुपये जबरदस्तीने काढुन , त्यांचे ओपो कंपनीचा मोबाईल भिंतीवर आपटुन नुकसान करुन लोकांचे मनामध्ये दहशत निर्माण करीत होता , याबाबत खडक पोलीस ठाणे येथे आरबाज / बबन शेख रा.चुडामन तालीम चौक पुणे याचे विरुध्द गुन्हा दाखल केला होता . सध्या तडीपार असलेला गुन्हेगार नामे आरबाज / बबन शेख याचा श्रीहरी बहिरट वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली शोध घेत असतांना पोहवा फहिम सैय्यद खडक पोलीस स्टेशन पुणे यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याप्रमाणे शिवशक्ती रिक्षा स्टॅण्ड , शंकरशेठ रोड पुणे येथे आरबाज ऊर्फ बबन इकबाल शेख वय २२ वर्षे रा . ३८६ , भवानी पेठ चुडामन तालीम चौक पुणे यास पकडुन त्याचेकडुन १ ,७०० / – रुपये रोख रक्कम व कोयता असा जप्त करण्यात आला आहे , सदर आरोपीची पार्श्वभुभी पाहता त्याचे विरुध्द खडक , समर्थ , लष्कर पोलीस ठाणे मध्ये मारमारी , घातक शस्त्र बाळगणे , घरफोडी , खंडणी मागणे , जबरी चोरी , विनयभंग यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यास मा.पोलीस उप आयुक्त , परिमंडळ -१ , पुणे यांचे कार्यालयीन तडीपार आदेश क्रमांक ०१/२०२१ अन्वये दिनांक १३/१/२०२१ पासुन २ वर्षाकरीता तडीपार केले आहे .

सदर गुन्हयाचा तपास श्री . यशपाल सुर्यवंशी पोलीस उप निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत . नमुद सर्व कारवाई ही

श्री . अभिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त पुणे शहर , श्री . राजेंद्र डहाळे , अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर , डॉ . प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे शहर व श्री . सतिश गोवेकर , सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्रीहरी बहिरट , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , हर्षवर्धन गाडे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , राहुल खंडाळे , विक्रम मिसाळ , संजय लोखंडे , यशपाल सुर्यवंशी पोलीस उप निरीक्षक व फहिम सैय्यद , संदिप पाटील , रवी लोंखडे , नितीन जाधव पोलीस अंमलदार राहुल मोरे , किरण शितोळे , हिम्मत होळकर , कल्याण बोराडे , विशाल जाधव , सागर घाडगे , तेजस पांडे , प्रविण गव्हाणे , महेंद्र कोलते यांचे पथकाने केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526.

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *