एटीएम फोडणा – या दोन आरोपींना अटक वाकड तपास पथकाची कारवाई .

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ता . २९ / ०९ / २०२१ पोलीस स्टेशन – वाकड

यु – टयुब वरील व्हिडीओ पाहुन एटीएम फोडणा – या दोन आरोपींना अटक करुन एकुण ०९ गुन्हे उघड वाकड तपास पथकाची कारवाई .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

मा . श्री . कृष्ण प्रकाश सो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड़ यांनी एटीएम फोडी सारखे गुन्हयांना गांभीयाने घेत सदर गुन्हयांना प्रतिबंध व गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले आहे . त्याप्रमाणे डॉ . विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक , वाकड पोलीस ठाणे यांनी त्याचे अधिनस्थ असलेले तपास पथकातील सपोनि श्री संतोष पाटील व तपास पथकातील अंमलदार यांना सदरबाबत सुचना दिल्या आहेत . त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशन तपास पथकातील सपोनि संतोष पाटील , सपोफो राजेंद्र काळे , पोहवा धुमाळ , पोहवा.जावेद पठाण , पोना.वंदु गिरे , पोना.प्रशांत गिरनबीने असे दि . २२ / ०९ / २०२१ रोजी वाकड हद्दीत पेट्रोलींग करीत असताना , पोना.वंदु गिरे यांना बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की , एटीएम फोडणारे दोन गुन्हेगार होंडा शाईन मोटार सायकलवरुन आदित्य बिला हॉस्पीटल धेरगाव पुणे येथे येणार आहेत . त्यांनी लागलीच सदरची बातमी सपोनि.संतोष पाटील यांना दिली . सपोनि . संतोष पाटील यांनी सदरची माहीती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर यांना कळविली , त्यांचे सूचनाप्रमाणे आदित्य बिला हॉस्पीटल येथे जावून सापळा लावणेत आला . काही वेळात तेथे होंडा शाईन मो सा नं.एमएच १४.एच.एस.९५३३ वरुन बातमीदाराने दिले वर्णनाचे दोन इसम येताना दिसल्याने सपोनि . पाटील व पोलीस पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांची नाव पत्ते विचारले असता त्यांनी आपली नाबे

( १ ) महादेव प्रकाश तिर्थ वय १९ वर्षे रा . चिंतामणी मंदीराचे बाजुला आनंद शेटे यांचे घरी भाडयाने वाल्हेकरवाडी चिचवड़ पूर्ण मुळ रा . विर हनमंतवाडी ता.जि.लातुर

( २ ) निशांत ज्ञानेश्वर गुळुजकर वय २४ वर्षे रा . सर्व नं .१२७ ग्रिनपार्क , चिंतामणी चौक , चिंचवड पुणे

अशी नावे सांगीतली . त्यांचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी बाकड , तळेगाव दाभाडे , चिखली , निगडी , चिंचवड , चाकण भामामध्ये मागील सहा महीन्यात एटीएम फोडल्याची कबुली दिली . सदरच्या आरोपींना अटक करुन त्यांच्याकडुन खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत . सादर चे आरोपी वर ९ गुन्हे उघडण्यात आले आहे .पोलीस स्टेशन गु.रजि. तळेगाव दाभाडे चिखली निगडी चिचवड चाकण.

ACS POLICE CRIME SQUAD

सदरची कारवाई मा , श्री कृष्णप्रकाश सो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा . डॉ.संजय शिंदे साो , अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , मा . श्री.आनंद भोईटे सो , पोलीस उप आयुक्त , परि २ , पिंपरी चिंचवड , श्री.श्रीकांत दिसले , सहा.पोलीस आयुक्त साो , वाकड विभाग , पिपरी चिचवड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.विवेक मुगळीकर , वरिष्ठ पोलीस निरिक्षक , सपोनि श्री.संतोष पाटील , पोलीस अंमलदार विभीषण कन्हेरकर , राजेंद्र काळे , बापु धुमाळ , विजय गंभोरे , विक्रम कुदळ , जावेद पठाण , वंदु गिरे , अतिश जाधव , प्रमोद कदम , प्रशांत गिलचीले , तात्या शिद , कौन्तेय खराडे , कल्पेश पाटील यांनी मिळुन केली आहे .

( श्री आनंद भोईटे ) पोलीस उप आयुक्त परिमंडळ -२ पिपरी चिचवड.

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *