सांगवी, पुणे- केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या तरुणाने काम

केअर टेकर म्हणून काम करणारा तरुणच निघाला ‘चोर’

सांगवी, पुणे- केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या तरुणाने काम करत असलेल्या घरातील दागिन्यांवर डल्ला मारला आणि काम सोडून निघून गेला. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी केअर टेकर तरुणाचा नाट्यमय पद्धतीने शोध घेऊन त्याला अटक केली. तसेच चोरून नेलेले २४ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली.

संदीप भगवान हांडे (वय २५, सध्या रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड पुणे. मूळ रा. पिंपरखेडा, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. संगीता अजित कांकरिया (वय ५२, रा. राजयोग बंगला, क्रांती चौक, कीर्ती नगर, नवी सांगवी) यांनी याबाबत १७ ऑक्टोबर रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांकरिया यांनी फिर्याद दिली की, त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने २४ तोळे सोन्याचे दागिने आणि ४० हजारांची रोख रक्कम चोरून नेली आहे. या गुन्ह्याचा तपास करताना कांकरिया यांच्या मुलाने सांगितले की, चोरीला गेलेले दागिने २० सप्टेंबर रोजी कपाटात ठेवले होते.

त्यानंतर ते दागिने कधी पाहिले नाहीत. दरम्यान २१ ते २५ सप्टेंबर या काळात एक मुलगा केअर टेकर म्हणून काम करत होता. पण तो अचानक काम सोडून गेला आहे. या माहितीवरून पोलिसांना केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या मुलावर संशय बळावला.

पोलिसांनी त्या तरुणाच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्याचा ठावठिकाणा शोधला. त्यानंतर त्याला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्याच्याशी संपर्क वाढवला. एके दिवशी त्याला भेटण्याची वेळ ठरवून पोलिसांनी कल्पतरू चौक येथे भेटण्यासाठी बोलावले. तरुण फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला सापळा लावून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केली असता त्याने ही चोरी केल्याचे सांगितले.पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेले २४ तोळे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये असा एकूण ६ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

न्यायालयाने त्याला २२ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *