रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकणा – सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकणा – या तिघांना अटक

ONLINE PORTAL NEWS 9822331526

सरकारी रेशन दुकानातील माल चढ्या दराने काळ्या बाजारात विकणाऱ्या तिघांना सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे . त्यांच्यासह दोन रेशन दुकानदारांवर जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

चंदन द्वारका गुप्ता ( वय ३८ ) , रितीक चंदन गुप्ता ( वय १८ दोन्ही रा . रहाटणी , काळेवाडी , वाकड , पुणे ) , शंकर आयोध्या गुप्ता ( वय २२ , रा . साईनगर , कॉलनी क्रमांक चार , नखाते वस्ती , रहाटणी , पुणे ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .

तर रेशन दुकानदार थोरात ( पुर्ण नाव माहित नाही , वय ४० , रा आनंदनगर झोपडपट्टी चिंचवड , पुणे ) , जांभळे ( पूर्ण नाव माहित नाही , वय ३० , रा . आनंदनगर , झोपडपट्टी , चिंचवड , पुणे ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , रविवारी ( दि .२७/०६/२०२१ ) सामाजिक सुरक्षा विभागाच्या विभागाच्या पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना माहिती मिळाली की , काळेवाडी येथून सरकारी रेशन दुकानातील माल काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केला जात आहे .

त्यानुसार पोलिसांनी पवारनगर गार्डनच्या बाजूला काळेवाडी येथे सापळा लावून छापा टाकला . त्यात दोन दुचाकी ( एमएच १४/ ई एल ६५३८ आणि एमएच १४ / जी एल १५४७ ) वाहने पोलिसांनी जप्त केली . तसेच तिघांना ताब्यात घेतले .

तिघांकडून ३७ हजार ४०० रुपये किमतीचे ३४ गव्हाचे पोते , ६७ हजारांच्या दोन दुचाकी , असा एकूण एक लाख चार हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . रेशन दुकानदार थोरात आणि जांभळे यांनी अटक केलेल्या तीन आरोपींना रेशन दुकानात वितरित होणारा गहू पुरवला असल्याचे निष्पन्न झाले आहे .अटक आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . वाकड पोलीस तपास करीत आहेत .

ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकातील उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे , धैर्यशिल सोळंके , पोलीस अंमलदार संतोष बर्गे , सुनिल शिरसाट , नितीन लोंढे , भगवंता मुळे , अनिल महाजन , संगिता जाधव , मारुती करचुंडे , गणेश कारोटे , राजेश कोकाटे सोनाली माने यांनी केली आहे .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *