मोटार सायकल चोरी करणा – या चोरास जेरबंद करून युनिट ६ कडुन ०८ मोटार सायकली जप्त
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दिनांक – २८/०६/२०२१ गुन्हे शाखा युनिट – ६ , पुणे शहर मौजेसाठी मोटार सायकल चोरी करणा – या चोरास जेरबंद करून युनिट ६ कडुन ०८ मोटार सायकली जप्त
ONLINE PORTAL NEWS 9822331526
वानवडी पोलीस स्टेशन गु.र.क्र .२०८ / २०२१ भा.द.वि.कलम ३७९ या गुन्हयाचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे अधिकारी व अंमलदार करित असताना
दिनांक २५/०६/२०२१ रोजी गुन्हे शाखा , युनिट ६ कडील पो . शि . ८२०३ पवार , पो शि . २९६१ व्यवहारे , पो . शि . ८१५९ ताकवणे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , नमूद गुन्हयातील मोटार सायकल चोरणारा इसम हा कॅम्प परिसरामध्ये फिरत आहे . सदरची माहिती श्री गणेश माने , पोलीस निरीक्षक , गुन्हे शाखा , युनिट ६ यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून इसम नामे शाहवेज शहजाद अन्सारी , क्य २५ वर्षे , रा . सध्या इंग्लीश बेकरी , शिवाजी मार्केट कॅम्प पुणे . मुळ रा मोहल्ला सय्यदवाडा , नगिना बिजनोर राज्य उत्तरप्रदेश यास त्याचे ताब्यातील मोटार सायकल सह ताब्यात घेतले . त्याच्या ताब्यातील मोटार सायकलबाबत तपास करता सदरची मोटार सायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले . नमूद आरोपीस गुन्हयात अटक करून त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली . पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान आरोपीकडून खालील गुन्हे उघडकीस आले .
१ ) वानवडी पोलीस स्टेशन गु . र . क्र . २०८/२०२१ भा . द . वि . कलम ३७९
२ ) लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२५/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९
३ ) कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ११०/२०१८ भा.दं.वि कलम ३७९ ,
४ ) शिक्रापुर पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण गु.र.नं. ७३/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९ ,
५ ) तोफखाना पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर गु.र.नं. ३२५/२०२० भा.दं.वि.कलम ३७९ ,
६ ) सुपा पोलीस स्टेशन , जि . अहमदनगर गु.र.नं. ८३/२०२१ भा.दं. वि . कलम ३७९
७ ) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४७१/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९
८ ) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४७३/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९
आरोपी शाहवेज शहजाद अन्सारी याच्याकडून २,८०,००० / – रु किंमतीच्या एकूण ०८ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत .
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह – आयुक्त पुणे शहर डॉ . रविंद्र शिसवे , मा , अपर पोलीस आयुक्त गुन्हे , पुणे शहर , श्री अशोक मोराळे , मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा , पुणे शहर , श्री श्रीनिवास घाडगे , मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा , पुणे शहर , श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री गणेश माने , सपोनि नरेंद्र पाटील , पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके , नितीन मुंढे , कानिफनाथ कारखेले , नितीन शिंदे , प्रतिक लाहिगुडे , सचिन पवार , ऋषिकेश ताकवणे , ऋषिकेश व्यवहारे , ऋषिकेश टिळेकर , शेखर काटे , नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांचे पथकाने केली आहे .
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526