पुण्यातील शिरूर तालुक्यातून धक्कादायक घटना. कामावरुन काढल्याच्या रागातून पुण्यात मॅनेजरची हत्या.apcs.news
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
एक धक्कादायक घटना समोर आली आहे.यामध्ये कामावरुन काढल्याच्या रागातून एका कामगाराने आपल्या मॅनेजरची हत्या केली आहे. ही हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील वडनेर या ठिकाणी ही हत्येची घटना घडली आहे. आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबीर खान (वय २४ वर्ष, रा. चेंबूर, मुंबई) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर शाहिद रफीक बागवान असे आरोपीचे नाव आहे.
पुणे:शिरूर तालुक्यातून(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान
आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबीर खान (वय २४, रा. चेंबूर, मुंबई) असे खून झालेल्या तरूणाचे नाव असून, त्याच्या खूनप्रकरणी शाहिद रफीक बागवान (रा. जाम मोहल्ला, भुसावळ रेल्वे स्टेशन, भुसावळ, जि. जळगाव) याला आज अटक करण्यात आली. त्यास शिरूर न्यायालयाने मंगळवार (ता. २८) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,काय घडले नेमके?
वडनेर – फाकटे रोडवर वडनेर येथे जाकीर गफार सय्यद यांचे फार्म हाऊस असून, त्यांचाच नातेवाईक असलेला आत्ताऊल्ला खान हा तेथे वास्तव्यास राहून फार्म हाऊसवरील कामे पाहात होता. संशयित आरोपी शाहिद बागवान हा त्याच्याकडे कामासाठी म्हणून आल्याने तेथेच वास्तव्यास होता. दरम्यान, कामावरून काढून टाकल्याचा राग आल्याने त्याने आत्ताऊल्ला खान याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. काल रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली. आत्ताउल्ला याचा खून केल्यानंतर फार्महाऊसमधील खोल्यांना बाहेरून कड्या लावून शाहिद बागवान पळून गेला. तथापि, तेथील इतर कामगारांना संशय आल्याने त्यांनी एका खोलीचे दार उघडून पाहिले असता खूनाचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत माहिती समजताच शिरूर चे पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले व एकनाथ पाटील, पोलिस हवालदार प्रफुल्ल भगत, नितीन सुद्रीक, पोलिस नाईक नीलेश शिंदे व विनोद मोरे, कॉन्स्टेबल दिपक पवार यांनी दोन पथके तयार करून संशयित शाहिद बागवान याचा ठावठिकाणा शोधण्यास सुरवात केली. त्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केला.

पोलिस पाटील राहुल जगताप, पोलिस मित्र दिपक घोडे व आकाश येवले यांनीही स्थानिक तरूणांना जागृत करून संशयित आरोपीबाबत माहिती दिली. काल रात्री उशिरा त्याला जांबूत (ता. शिरूर) येथील बाजारतळावरून ताब्यात घेतले. संशयित शाहिद बागवान याने खूनाची कबूली दिली असल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलिस निरीक्षक पन्हाळकर यांनी दिली.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 98223315W6

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad