पुण्याचे विमाननगर हद्दीत हुक्का बार अवैध धंदेवर पोलिसांचा छापा.

ACS POLICE CRIME SQUAD

हुक्क्याची ‘तलब’ भागविणार्‍या हॉटेलवर पोलिसांची कारवाई : विमाननगर हद्दीत अवैध धंदे सुरुच!

विमानतळ हद्दीत अवैधधंदा आढळल्यामुळे संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेवर पोलीस आयुक्त कारवाई करणार का???

दिनांक- ३१/०८/२०२१
पुणे शहरात सर्वत्र कडेकोटपणे अवैध धंदे बंद असताना विमाननगर हद्दीत मात्र हुक्क्याची ‘तलब’ भागविण्यासाठी सुरू असलेल्या बारवर गुन्हे शाखा व सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करुन कारवाईचा दणका दिला आहे.

हॉटेल तलब, देवकर चौक, देवकर वॉशिंग सेंटरजवळ अवैधरित्या हुक्का बार चालु होते. याबाबत वरिष्ठांकडे गोपनिय माहिती प्राप्त झाल्यामुळे सामाजिक सुरक्षा विभाग पो.नि. शिल्पा चव्हाण, अंमली पदार्थ विरोधी पथक-२ पो.नि. विनायक गायकवाड यांचे पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला .

गुन्हे शाखा अंतर्गत कारवाई विमाननगर येथील हॉटेलमध्ये अवैधरित्या चालु असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेचा छापा दि .३०/०८ /२०२१ रोजी मा.वरिष्ठांकडुन गोपनीय माहीती प्राप्त झाली की , हॉटेल तलब देवकर चौक , देवकर वॉशिंग सेंटर जवळ विमाननगर पुणे येथे अवैधरित्या हुक्का बार चालु असलेबाबत माहीती प्राप्त झाल्याने सदर गोपनीय बातमीची खातरजमा करण्याकरीता शिल्पा चव्हाण पोलीस निरीक्षक सामाजिक सुरक्षा विभाग श्री विनायक गायकवाड पोलीस निरिक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा , पुणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे व सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हेशाखेकडील पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमीची खात्री केली असता , सदर हॉटेल चा मालक (सचिन अशोक रणपिसे वय ३० वर्षे रा . येरवडा पुणे ), (अमर संतोष गायकवाड वय २६ वर्षे रा येरवडा पुणे) व हॉटेल मॅनेजर दिलीपकुमार मांगीलाल मालविया वय २६ वर्षे , रा . हडपसर पुणे यांचे करवी सदर हॉटेल मध्ये बेकायदेशीर पणे हुक्का बार चालवुन ग्राहकांना हुक्का सेवन करण्याकरीता पुरवीत असताना मिळुन आल्याने वरील हॉटेल चालक व मॅनेजर यांचे विरुध्द सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने ( महाराष्ट्र सुधारणा ) अधिनियम २०१८ चे कलम ४ अ . २१ अ , तसेच भादंवि कलम २६९ , २७० अन्वये विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर कारवाईमध्ये त्यात वेगवेगळे हुक्का फ्लेवर्स , ११ हुक्का पॉट चिलीम पाईप व दोन मोटर सायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे .

सदरची कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त श्री.अमिताभ गुप्ता , पोलीस सह – आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री . श्रीनिवास घाडगे , यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गायकवाड अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा , अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा व सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अंमलदार यांनी केली आहे ,

काही दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्त डॉ.अमिताभ गुप्ता यांनी हद्दीत सुरू असलेल्या अवैधधंद्यांबाबत संबंधित वरिष्ठ निरिक्षकाला जबाबदार धरण्यात येईल असे सुनावले होते व त्याअनुषंगाने हमीपत्र घेतले होते. विमानतळ हद्दीत अवैधधंदा आढळल्यामुळे संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेवर कारवाई करुन पोलीस आयुक्त आपला शब्द खरा करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *