कोंढवा येथे अवैध धंदे वर सामाजिक सुरक्षा विभागाच्या छापा .
ACS POLICE CRIME SQUAD
दिनांक ११/१२/२०२१ . सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा पुणे शहर अवैध्यरित्या विदेशी दारु , पोकर जुगाराची साधने , परकीय चलने रहात्या घरात बाळगणा – या इसमावर कोंढवा येथे गुन्हे शाखेचा छापा .
दि . १०.१२.२०२१ रोजी मा . वरिष्ठांकडुन गोपनीय माहीती प्राप्त झाली की , सैनिक नगर क्लाऊड नाईन सोसायटी बंगला नंबर १६ एन.आय.बी.एम (NIBM) कोंढवा पुणे येथे इसम नामे जितेन जगदिप सिंग हा पोकर जुगार खेळत व घेत असून त्या ठिकाणी जुगार खेळण्यास येणारे लोकांना तो विदेशी दारु पुरवित असलेबाबत माहीती प्राप्त झाली , सदर गोपनीय बातमीची खातरजमा करण्याकरीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण सामाजिक सुरक्षा विभाग ( अति कार्य ) पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड अंमली पदार्थ विरोधी पथक -१ गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार स्टाफ तसेच ३ परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक असे सदर ठिकाणी जावुन बातमीची खात्री केली , सदर बंगल्यामध्ये इसम नामे जितेन जगदिप सिंग वय ४२ वर्षे रा . सैनिक नगर क्लाऊड नाईन सोसायटी बंगला नंबर १६ एन . आय.बी.एम कोंढवा पुणे ह्याचे ताब्यात अवैधरित्या १,०७,१५० / -रुकि च्या विदेशी दारुच्या बाटल्या , १,४२,५०० / – रु कि चे पोकर जुगाराची साधने त्यात १० काऊंटर चिपचे बॉक्स , १३ पोकर टेबल , ३० पत्त्याचे कॅटचे बॉक्स व १ वेगवेगळे आकडे असलेले रुले तसेच रोख रक्कम ४७,७६,५०० / रुपये परदेशी चलन ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन ५५०० डॉलर व युएस ६७०० डॉलर ज्याची भारतीय चलनामध्ये ८,०४,४०७ / – रु कि एवढी किंमत असलेले असा एकूण ५८,३०,२७५ / – रुपयाचा मुद्देमाल मिळून आला . सदरचा मुद्देमाल जप्त करून त्यांचे विरुध्द महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम ६५ ( ई ) अन्वये कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
सदरची कारवाई पुणे शहरचे मा.पोलीस आयुक्त श्री . अमिताभ गुप्ता , मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे पुणे श्री रामनाथ पोकळे , मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे मा . श्रीनिवास घाडगे , यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा , पुणे शहर पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड अंमली पदार्थ विरोधी पथक- १ सासुवि गुन्हे शाखेकडील पोउपनि श्रीधर खडके , परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे शिवाजीनगर पो स्टे , विशाल शिंदे स्वारगेट पो स्टे , सचिन तरडे उत्तमनगर पो स्टे , सामाजिक सुरक्षा विभागाकडील महिला पोलीस अंमलदार मोहिते , पुकाळे , पोलीस अंमलदार मोहिते , चव्हाण , पठाण , कोळगे व अंमली पदार्थ विरोधी पथक -१ कडील पोलीस अंमलदार जाधव , पवार , उत्तेकर , साळुंके , पारधी , शेख मोहिते यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526