दरोडा टाकुन विक्रेत्यांना खंडणी मागणा या आरोपी लष्कर पोलीस स्टेशन ने केली कारवाई.

ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक १०/१२/२०२१ लष्कर पोलीस स्टेशन , पुणे शहर दरोडा टाकुन विक्रेत्यांना खंडणी मागणा – या सराईतांना तात्काळ केले जेरबंद .

लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा , रजि . नं . १६४/२०२१ भा.द.वि कलम ३९५,३८६ , ३२३,५०४ , ५०६ , आर्म अॅक्ट कलम ४ ( २५ ) मुपोअॅक्ट कलम ३७ ( १ ) सह १३५ फौजदारी कायदा अधिनियम कलम ७ मधील

फिर्यादी नामे सद्याम असिमुददीन हुसेन , वय २३ वर्षे , व्यवसाय पथारी , रा . भंडारशाह मशिद जवळ , चुंडामन ताडीम , भवानी पेठ , पुणे , यांनी फिर्याद दिली की ,

दि . ०९ /१२ /२०२१ रोजी संध्याकाळी ०६/३० वा . सुमारास ते एम . जी . रोड , सारेगमा या दुकानासमोर , कॅम्प , पुणे येथील फुटपाथवर कपडे विक्री करीत असताना शानु शेख व त्याचेबरोबर चार अनोळखी इसमानी संगनमताने फिर्यादीला फुटपाथवर धंदा लावण्यासाठी हप्ता मागीतला व फिर्यादीने त्यास नकार दिला असता फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण करुन फिर्यादीचे खिश्यातील अंदाजे रक्कम रुपये ३५०० / – पालघनचा धाक दाखवुन जबरदस्तीने घेवुन गेले बाबत तक्रार दिल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल करुन दाखल गुन्हयाचा तपास करणे कामी लष्कर पो स्टेकडील पोउपनि डोंगळे , स्टाफ संशयित आरोपीचा हददीत शोध घेण्याकरीता रवाना झाले होते . दाखल गुन्हयातील संशयित आरोपींचा शोध घेत असताना त्यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नमुद गुन्हयातील आरोपी हे बिशप स्कुल शेजारी , पडीक बंगल्याजवळ , कॅम्प , पुणे येथे थांबलेले आहेत . त्याप्रमाणे पोलीस उप निरिक्षक डोंगळे हे स्टाफसह नमुद ठिकाणी गेले असता तेथे उभे असलेले फिर्यादीत नमुद वर्णनाचे तीन संशियत इसम त्यांना पाहुन पळुन जावू लागले . वरील तपास पथकातील पोलीस स्टाफने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव , पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे

१ ) शानु शफिक शेख , वय १९ वर्षे , व्यवसाय – पथरी , रा.ठी सर्व्हे क्र . १०८ , १०९ , ताकवणे क्लीनीक जवळ , रामनगर , रामटेकडी , हडपसर , पुणे

२ ) आर्शद आयुब पठाण , वय २५ वर्षे , व्यवसाय – सिक्युरीटी गार्ड , रा.ठी सर्व्हे क्र . १०८ , १०९ , अंध शाळेसमोर , रामटेकडी , हडपसर , पुणे

३ ) रिहान नझीर अहमद शेख , वय २५ वर्षे , व्यवसाय – एसी रिपेरिंग , रा.ठी. घर क्र . ४२ , सवेरा पार्क , कांढवा , पुणे

असे असल्याचे सांगितले त्यांचकडे नमुद गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवीचे उत्तरे दिली . त्यांना पोलीस ठाणे येथे आणुन विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी संगनमताने सदरचा गुन्हया केल्याचे कबुल केले . त्यांना दाखल गुन्हयात दि . ०९ /१२/२०२१ रोजी २३:५५ वा . अटक केली आहे . अटक आरोपींची अंगझडती घेतली असता ,

अटक आरोपी नामे आर्शद आयुब पठाण , वय २५ वर्षे याच्या अंगझडतीमध्ये रोख रक्कम रू . ३२५० / – मिळून आल्याने ती दोन पंचासमक्ष गुन्हयाचे पुरावे कामी जप्त करुन ताब्यात घेतली आहे .

तसेच सदर गुन्हयातील दोन आरोपी हे गुन्हे शाखा पुणे शहर यांनी अटक केले आहे . सदर गुन्ह्याचा तपास श्री सागर पाटील पोलीस उप आयुक्त , परि २ पुणे शहर , श्री यशवंत गवारी सहा . पोलीस आयुक्त लष्कर विभाग , श्री अशोक कदम वरिष्ठ पोलीस निरिक्षक व श्री कविदास जांभळे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) लष्कर पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयातील आरोपी १२ तासाचे आतमध्ये सहा पोलीस निरिक्षक शिळमकर , सहा पोलीस निरिक्षक राऊत , पोलीस उप निरिक्षक डोंगळे , पोहवा कदम , पोना कोळी , पोना नदाफ , पोना मेंगे , पोना मांजरे , पोशि भोसले यांनी सदर कामगिरी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *