गणेश उत्सवाच्या पार्श्वभुमीवर पुणे शहरामध्ये मिळुन आला पिस्टल साठा, शाखा युनिट -२ कडुन जेरबंद.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
गणेश उत्सवाच्या पार्श्वभुमीवर पुणे शहरामध्ये मिळुन आला पिस्टल साठा, रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडुन तब्बल ५ पिस्टल ३ खाली मॅगझीन व ११ जिवंत काडतुसासह आरोपी गुन्हे शाखा युनिट -२ कडुन जेरबंद.
गणेश उत्सवाच्या पार्श्वमाभुमीवर.पोलीस आयुक्त सो यांनी गुन्हेशाखे कडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांना महत्वाच्या सूचना दिल्या होत्या , त्या अनुषंगाने पोलीस अंमलदार गजानन सोनुने. व उज्वल मोकाशी. यांना बातमी मिळाली की परराज्यातून मोठ्या प्रमाणात पिस्टल विक्रीसाठी पुणे येथे येत असून त्यापैकी १ पिस्टल इस नाम आकाश जाधव. रा. भिलारेवाडी, काजण, पुणे. याचे ताब्यात आहे.
अशी खात्रीशिर बातमी प्राप्त होताच यूनिट २ प्रभारी श्री क्रांतीकुमार पाटील. यांचे मार्गदर्शनाखाली वैशाली भोसले, विशाल मोहिते, पो.उप.नि. राजेंद्र पाटोळे. तसेच युनिट -२ कडील पोलीस अमलदार गजानन सोनुने. उज्ज्वल मोकाशी, कादीर शेख, संजय जाधव. उत्तम तारू. यांच्या मदतीने.
दिनांक १३/०८/२०२२ रोजी यूनिट -२ हदीमध्ये स्वातंत्र दिन ऑपरेशन निमीत्त, प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना बातमीप्रमाणे आकाश प्रकाश जाधव. वय २३ वर्षे, रा. मिलारेवाडी, कात्रज, पुणे.
यास नटराजहॉटेल, स्वारगेट, पुणे. येथुन ताब्यात घेवून त्याचे अंगझडती मध्ये ५५,२०० / -रु चे १ पिस्टल मॅगझीनसह, १ खाली मॅगझीन एक जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्याचे जवळ अग्निशत्र जवळ बाळगण्या बाबत कोणतेही परवाना नसल्याने त्याचे विरुध्द स्वारगेट पो.स्टे. गु.र. न. 172/2022 आर्म अॅक्ट 3( 25 ) च महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 ( 1 ) ( 3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करून दाखल गुन्हयाचा तपास वरीष्ठाच आदेशान्वये युनिकडील पोलीस उप – निरीक्षक राजेंद्र पाटोळे. यांचेकडे दिल्याने आकाश प्रकाश जाधव. पोलीस कस्टडी दरम्यान यातील पाहिजे मुख्य आरोपी नामे मुजम्मील हरुण बागवान. रा. वार्ड क्र. २ श्रीरामपुर, जिल्हा अहमदनगर. यास अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान पुणे येथील नातेवाईकाचे रहाते घरातुन व श्रीरामपुर येथील राहते घरातून पंचनाम्याने ४ पिस्टल मॅगझीनसह २ खाली मॅगझीन, १० जिवंत काडतुस व अगोदर जात केलेले १ पिस्टल असे सर्व मिळूण
एकुण २,४७,२००/ – रु किमतीचे ५ पिस्टल मॅगझीनसह ३ खाली मॅगझीन व ११ जिवंत काडतुस असे घातक अग्निशत्रे हस्तगत करण्यात यश आले आहे. तपासामध्ये आणखी अवैध पिस्टल मिळुन येण्याची शक्यता असल्याने गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखे कडील पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र पाटोळे हे करीत आहेत .
अटक आरोपी नामे मुजम्मील बागवान. याचेवर खुन, अग्निशत्रे खरेदी विक्री करणे, तसेच जवळ बाळगणे असे गुन्हे दाखल आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, पालीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप – आयुक्त गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे, सहा पो आयुक्त, गुन्हे, श्री गजानन टोम्पे. यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा, युनिट -२, पुणे शहर, सहा.पो.निरी, वैशाली भोसले, विशाल मोहित, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अमलदार गजानन सोनुने, उज्ज्वल मोकाशी, कादीर शेख उत्तम तारु, संजय जाधव, समिर पटेल, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, निखिल जाधव, मोहसिन शेख, गणेश थोरात, प्रमोद कोकणे, शंकर नेवसे, राहुल राजपुरे, नागनाथ राख, यांनी केली आहे.
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad