अर्धनग्न फोटो मित्रांना दाखवत केली बदनामी ;खडक पोलिसांनी केली ग्रामीण पोलिस कर्मचाऱ्याला अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

Pune Crime | महिला पोलिसाशी अनैतिक संबंध , अर्धनग्न फोटो मित्रांना दाखवत केली बदनामी ; पोलिस कर्मचाऱ्याला अटक.

पुणे : महिला पोलीस शिपायाला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले . तिला वारंवार मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली . तिचे अर्धनग्न फोटो काढून मित्रांना दाखवून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . याप्रकरणी खडक पोलिसांनी एका पोलीस शिपायाला अटक केली आहे .

संदीप कुंडलिक जाधव असे या पोलीस शिपायाचे नाव आहे .

सध्या तो पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे . हा प्रकार नोव्हेबर २०२० पासून सुरु होता . याबाबत एका महिला पोलीस अंमलदाराने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद ( गु . रजि . नं . २५३/२२ ) दिली आहे . याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी व आरोपी हे एकत्र काम करीत असताना आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले . इतर मुलींशी अनैतिक संबंध ठेवून फिर्यादी यांच्यासोबत लग्न न करता त्यांची फसवणूक केली . त्यांना वारंवार मारहाण करुन मारुन टाकण्याची धमकी दिली . त्यांचे अर्धनग्न फोटो काढून ते मित्रांना दाखवून बदनामी केली .

हे समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली असून पोलिसांनी संदीप जाधव याला अटक केली आहे .

पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत .

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

पुणे , पिंपरी – चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप , फक्त क्लिक करा.

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *