पुण्यात कोयते उगारून दहशत निर्माण करणार्यांवर कठोर कारवाई – पोलिस आयुक्त रितेश कुमार .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
६/०१/२०२३ ACS NEWS
भररस्त्यात आणि गर्दीच्या ठिकाणी कोयते नाचवत दहशत निर्माण करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. पुणे पोलिस दलातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकार्यांची आज पोलिस आयुक्तालयात बैठक पार पडली. त्या बैठकीत पोलिस आयुक्तांची सर्व अधिकार्यांना गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलिसांनी प्लॅनिंग केल्याचं देखील आयुक्तांना स्पष्ट केलं आहे.
गेल्या काही काळामध्ये शहरात कोयते हातात नाचवत परिसरात दहशत निर्माण करण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. कोयते हातात नाचवत कोयता गँग शहरात दहशत निर्माण केल्याच्या घटना वाढल्याने पत्रकारांनी अशा घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून नेमकी काय उपाययोजना करण्यात येणार आहे असे विचारण्यात आले होते. त्यावर पोलिस आयुक्त रितेश कुमार बोलत होते. सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांना तसेच वरिष्ठ अधिकार्यांना दहशत निर्माण करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण दिले आहेत. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) आणि झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) सराईत गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर गेल्या 5 ते 6 वर्षात परिसरात दहशत निर्माण करणार्यांची लिस्ट काढून त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
16 ते 18 वर्षाच्या दरम्यानची मुले देखील गुन्हेगारी करताना दिसत आहेत. याबाबत पोलिस आयुक्त म्हणाले की, अल्पवयीन मुलांच्या विरोधात कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यातील तरतुदींचा आधार घेण्यात येणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभुमीवर असणार्या अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या अल्पवयीन मुलांवर कारवाई देखील होणार असून त्यांचे समुपदेशन देखील केले जाणार आहे. आगामी 2 ते 3 महिन्यात याचे परिणाम पाहायला मिळतील.
Web Title :- Strict action will be taken against those who created
terror in Pune – Police Commissioner Ritesh Kumar
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad