बंदी असलेल्या नॉयलॉन मांजा विक्रेत्यावर पुणे शहर पोलिसांची धडक कारवाई.खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
बंदी असलेल्या नॉयलॉन मांजा विक्रेत्यावर पुणे शहर पोलिसांची धडक कारवाई.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
दिनांक – ०८/०१/२०२३ :- पुणे शहर गुन्हे शाखा युनिट- ४, शोध पथकाने नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करून नायलॉन मांजा जप्त केला.
मा.न्यायालयाने मानव, पशु, पक्षी यांच्या जीवीतास धोका निर्माण करणारा नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घातली आहे. तरी सुद्धा पुणे शहरातील काही व्यापारी बंदी असलेल्या नायलॉनची विक्री करतात. बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे मानव, पशु, पक्षी यांच्या जीवीतास धोका निर्माण होवु नये या उद्देशाने मा. पोलीस आयुक्त यांनी पुणे शहरामध्ये बंदी असलेल्या नायलॉनची विक्री करणा-या व्यापा-यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते.
याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तांबोळी जनरल स्टोअरचे मालक आदिप अब्दुल करीम तांबोळी रा. १९२, जुना बाजार, खडकी, पुणे असे आरोपीचे नाव आहे.बंदी असलेल्या नायलॉनची विक्री करतात. बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे मानव, पशु, पक्षी यांच्या जीवीतास धोका निर्माण होवु नये या उद्देशाने पोलीस आयुक्त यांनी पुणे शहरामध्ये बंदी असलेल्या नायलॉनची विक्री करणा-या व्यापा-यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते.
व वरिष्ठांनी दिलेल्या आदेशास अनुसरुन गणेश माने, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, युनिट ४ पुणे शहर यांनी त्यांचे अधिनस्थ अधिकारी व कर्मचारी यांना बंदी असलेल्या नायलॉनची विक्री करणा-या व्यापा-यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.यांना खडकी परिसरात एक जण बेकायदेशीररीत्या नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक व कर्मचारी यांनी खडकी येथे जाऊन खात्री केली. संशयित तांबोळी जनरल स्टोअर येथे नायलॉन मांजाच्या गट्टू बाळगून असल्याचे आढळून आला. पथकाने कारवाई करत त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध प्रकारचे नॉयलॉन मांजाचे गट्टू हस्तगत केले व मालक आदिप अब्दुल करीम तांबोळी रा. १९२, जुना बाजार, खडकी, पुणे याचे विरुद्ध पोलीस ठाणे खडकी येथे भा.द.वि. कलम १८८ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त रितेशकुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त गुन्हे,रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे – २ नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील, सहा पोलीस फौजदार महेंद्र पवार, पोलीस अंमलदार विनोद महाजन, स्वप्निल कांबळे, वैशाली माकडी यांनी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad