मुंढवा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी दाखल दिवसा घरफोडीचा केला कौशल्यपुर्ण तपास. तब्बल ५ लाख किमतीचे दागिने केले आरोपीकडुन हस्तगत.मुंढवा पोलीस स्टेशनची कामगिरी.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
दिनांक १७/०७/२०२३:(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.
मुंढवा पोलिसांनी बीटी कवडे रोडवरील एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये भरदिवसा घरफोडी चोरी करणार्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून ५ लाख रूपये किंमतीचे दागिने जप्त केले आहेत.
फिर्यादी हे कामानिमित्त घराबाहेर गेले असताना त्यांचे घरातील १० तोळे सोन्याच्या अंगठया चोरणाऱ्या आरोपीला मुंढवा तपास पथक पोलिसांनी अटक केली आहे,,

तपास पथक प्रमुख श्री संदीप जोरे व टिम यांची दमदार कामगिरी..
मुंढवा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी दाखल दिवसा घरफोडीचा केला कौशल्यपुर्ण तपास. तब्बल ५ लाख किमतीचे दागिने केले आरोपीकडुन हस्तगत.
याबाबत सविस्तर बातमी अशी की दिनांक ११/०७/२०२३ रोजी मुंढवा पोलीस ठाणे हददीत बीटी कवडे रोडवरील असणा-या उच्चभु पाम ग्रुव्ह सोसायटी मध्ये राहणारे इसम हे त्यांचे खाजगी कामानिमित्त घराबाहेर गेले असताना त्यांचे घरातील १० तोळे सोन्याच्या अंगठया कोणीतरी अज्ञात इसमाने दिवसा घरफोडी करुन चोरी केलेबाबत तक्रारदार यांचे सांगणेप्रमाणे मुंढवा पोलीस ठाणे गुर नं २२९ / २३ भादवी ४५४ ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपासाचे पुढील आदेश मुंढवा पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री विष्णु ताम्हाणे यांनी तपास पथक प्रमुख श्री संदीप जोरे व टिम यांनी दिल्याने सदर टीम तपास करीत असताना फिर्यादी यांचे कडे अधिक चौकशी केली असता फिर्यादी यांचे घराचे नुतनिकरणाचे काम काही दिवसापुर्वी झाले असल्याची माहीती त्यांचेकडुन मिळाली सदर माहीती अनुशंगाने मुंढवा पोलीसांनी फिर्यादी यांचे घरात काम करुन गेलेले सर्व मजुरांना बोलाविले असता पोलीस खाक्या दाखविल्याने त्यातील एकाची वाचा फोडण्यात पोलीसांना यश आले. सदर व्यक्तीकडुन गुन्हयात गेला सर्व माल म्हणजे एकुण १० तोळे सोन्याचे दागिने एकुण ५.००.०००/- रु चे संपुर्णपणे हस्तगत करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अक्षय अशोक पंडीत वय २८ वर्षे रा ३६ / ३७ सदगुरु अपार्टमेंट टिंगरेनगर रोड विश्रांतवाडी असे आहे. सदर कामगिरी बददल नागरीकांनी मुंढवा पोलीसांचे कौतुक करीत आहेत.

सदरची कामगीरी मा. श्री रीतेशकुमार साो, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णीक सो, सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, मा. श्री विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. श्रीमती अश्विनी राख मॅडम, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे पुणे, श्री प्रदिप काकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलीस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संदिप जोरे, दिनेश राणे दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे सचिन पाटील व स्वप्नील रासकर यांनी केली आहे.

(विष्णु ताम्हाणे) वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा पोलीस ठाणे पुणे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad