तडीपार इसमास धारदार हत्यारासह दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ने केले जेरबंद.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

खडकी पोलीस स्टेशन कडील तडीपार इसमास धारदार हत्यारासह दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ने केले जेरबंद.

आज दि ०२/०६/२०२२ रोजी गुन्हे शाखा, दरोडा पथक-२

दरोडा पथक-२ चे पथक खडकी पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पोलीस अमलदार गणेश लोखंडे यांना खडकी पोलीस स्टेशन कडील तडीपार असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे दाऊद दिलावर शेख, वय २५ वर्षे रा घर नं २२५, इंदिरानगर वसाहत खडकी बाजार पुणे,

हा इंदिरानगर वसाहत,खडकी बाजार स्वतःच्या घरी आला आहे. अशी बातमी मिळाल्याने त्यांस लागलीच स्टाफच्या मदतिने ताब्यात घेवून त्याचेवर खडकी पोलिस स्टेशन गु.र.नं.१४३/२०२२ मुं.पो.ऍक्ट १४२ व आर्म ऍक्ट ४(२५) प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कार्यवाही करिता खडकी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


सदरची कामगिरी माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री.नारायण शिरगावकर, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.सुनिल पंधरकर, सहा.पो.नि.पाडवी, पोलीस अंमलदार ,राजेश लोखंडे विनायक रामाणे,मनोज खरपुडे,गणेश लोखंडे,सुदेश सपकाळ,अमोल सरतापे यांनी केली आहे.


सुनिल पंधरकर पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा दरोडा पथक-२ पुणे शहर.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL



CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *