पुण्यातील शिवशंकर गिरीजा सहकारी गृहरचना संस्थेच्या चेअरमन,सचिवाला पदावरून उपनिबंधकांनी हटवले,.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुण्यातील शिवशंकर गिरीजा सहकारी गृहरचना संस्थेच्या चेअरमन,सचिवाला पदावरून उपनिबंधकांनी हटवले,

पुणे प्रतिनिधी, (ACS NEWS) उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर ४, यांनी शिवशंकर गिरीजा सहकारी गृहरचना संस्था मर्या. संस्थेचे चेअरमन वसंत रामजी चंदन व सचिव लक्ष्मण बलाना डरोलो यांना अनर्ह घोषित केले आहे.

शिवशंकर गिरीजा सहकारी गृहरचना संस्था मर्या. संस्थेचे चेअरमन वसंत रामजी चंदन व सचिव लक्ष्मण बलाना डरोलो हे मनमानीपणे वागून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन न करता अवाजवी व बेकायदेशीरपणे देखभाल शुल्काची मागणी करून त्याबाबत संस्थेच्या सभासदांना नाहक त्रास देत होते.

या मनमानी कारभारा विरूध्द शराफत खान व विराज सूरतवाला यांनी उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर ४,यांचेकडे रितसर अर्ज दाखल केला व त्याकामी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेवून तसेच पुरावे व दाखल कागदपत्रे या सर्व बाबींचा विचार करून तसेच कायदयाचे तरतुदींचे विचार करता उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर ४,


यांनी दि.२६/०५/२०२२ रोजी आदेश पारीत करून शिवशंकर गिरीजा
सहकारी गृहरचना संस्था मर्या. संस्थेचे चेअरमन वसंत रामजी चंदन व सचिव लक्ष्मण बलाना डरोलो यांना पदावर राहण्यापासून अनर्ह ठरवण्याचा आदेश पारीत करण्यात आला आहे.

आदेश

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९अ ( ३ ) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी डॉ . आर . एस . धोंडकर , उपनिबंधक सहकारी संस्था , पुणे शहर ( ४ ) पुणे

आदेश देतो की , शिवशंकर गिरीजा सहकारी गृहरचना संस्था मर्या . , स . नं . २५/२ , हिस्सा नं २ , कोंढवा खुर्द , पुणे ४११०४८ ,

या संस्थेचे चेअरमन श्री चेअरमन श्री . वसंत रामजी चंदन व सचिव श्री . लक्ष्मन बलाना डारेलो यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९अ नुसार शासना ने दिनांक ०९ ऑगस्ट २००१ अन्वये सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यास कसुर केल्यामुळे . या आदेशाचे दिनांका पासून पुढील सहा वर्षांच्या कालावधीसाठी सदर संस्थेच्या समितीचा सदस्य असण्याचे चालू राहण्यास अनर्ह घोषित करण्यात येत आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *