परदेशात नोकरी लावण्याचे अमिषाने पैसे उकळणारी अस्तित्व लपवुन पोलीसांना गुंगारा देणारी महिला जेरबंद

ACS POLICE CRIME SQUAD

CRIME REPORTER RAEES KHAN

दिनांक – ०३/०८/२०२१ युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर परदेशात नोकरी लावण्याचे अमिषाने लोकांकडुन पैसे उकळणारी , सुमारे १६ वर्षापासुन आपले नाव बदलुन व अस्तित्व लपवुन पोलीसांना गुंगारा देणारी महिला जेरबंद

दिनांक – ०४/०७/२००५ रोजी फिर्यादी श्री . ज्ञानेश्वर विश्वास जमदाडे वय – ३२ रा – हिलटॉप सोनगिरी , धनकवडी पुणे यांनी खडक पोलीस स्टेशन पुणे येथे घटनेबाबत फिर्याद दिलेली आहे . त्याप्रमाणे गुन्हयातील आरोपी अबिदअली मसुदअली सैय्यद रा – १०७३ न्यु नाना पेठ , अजीज मंजील बिल्डिंग पुणे , अब्दुलवहाब महमंदहनीफ मुजावर रा – सैय्यदनगर , गंगा व्हिलेजसमोर हडपसर पुणे व राहत सैय्यद मॅडम रा – नुराणी मजिदजवळ , जुना मोटार स्टैंड भवानी पेठ पुणे यांनी आपसात संगणमत करुन फिर्यादी व त्यांचे मित्र सुरेश रक्ती , प्रज्ञावंत करमरकर व इतर यांना परदेशात नोकरी लावतो असे अमिष दाखवुन , त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडुन एकुण रक्कम रुपये चार लाख घेवुन त्यांना नोकरी न लावता व घेतलेले पैसे परत न देता त्यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक केल्याबाबत त्यांचेविरुध्द तक्रार दिलेली आहे त्याबाबत खडक पोलीस स्टेशन पुणे गुरनं – १८३/२००५ भादंवि कलम ४२० , १०९ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे . दिनांक – ०३/०८/२०२१ रोजी युनिट – १ गुन्हे शाखा पुणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार कार्यालयात हजर असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना त्याचे गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर बातमी मिळाली की , परदेशामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक लोकांकडुन पैसे घेवुन त्यांची फसवणुकी करणारी व सोळा वर्षापासुन गुन्हयात फरार असलेली महिला राहत सैय्यद ही साकोरे नगर , विमाननगर पुणे या भागात आपले नाव बदलुन व अस्तित्व लपवुन राहत आहे . अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरील स्टाफसह साकोरे नगर विमाननगर पुणे या भागात पहाटेच्या वेळेस सापळा लावला असता संशयीत महिला सकाळी मॉर्निग वॉकसाठी जात असताना दिसली तिस ताब्यात घेतले व तिस नाव पत्ता विचारता प्रथम तिने आपले नाव सौ . अलका शर्मा असे असल्याचे सांगीतले परंतु तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने आपले खरे नाव सौ . राहत तालीबअली सैय्यद ऊर्फ अलका भगवानदास शर्मा वय – ५४ रा – ३०३ आनंदयोग सोसायटी . साकोरेनगर विमाननगर पुणे मुळ रा – बी / ३१२ डीडीओ प्लॅट जागीरपुरी दिल्ली – ११००३ असे असल्याचे सांगीतले आहे तिचेकडे सखोल तपास केला असता तिचा गुन्हयात सहभाग असल्याचे व सदर गुन्हयामध्ये ती सुमारे सोळा वर्षापासुन फरार निष्पन्न झाले आहे तिला पुढील कारवाईसाठी खडक पोलीस स्टेशन पुणे यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे .

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह – आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त श्री अशोक मोराळे गुन्हे शाखा पुणे , मा.पोलीस उप आयुक्त , श्री.श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहर , मा.सहा.पोलीस आयुक्त श्री.सुरेंद्रकुमार देशमुख , गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदशनाखाली युनिट -१ गुन्हे शाखा , पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे , युनिट -१ गुन्हे कडील पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड , सुनिल कुलकर्णी , पोलीस अंमलदार अजय थोरात , अमोल पवार , इम्रान शेख , तुषार माळवदकर , महिला पोलीस अंमलदार मिना पिंजण व रुखसाना नदाफ यांनी केली आहे . .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *